Sunday, May 19, 2024

सुशांत सिंग अन् दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचे सत्य येईल समाेर? उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मोठा अपडेट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्म’हत्येने संपूर्ण देश हादरला होता. सुशांतच्या आत्म’हत्येच्या काही दिवस आधी त्याची मॅनेजर दिशा सालियनचाही मृत्यू झाला होता. या घटनेच्या तीन वर्षांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही प्रकरणांबाबत मोठं अपडेट शेअर केली आहे. एका मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणातील सीबीआयच्या तपासाबाबत विचारण्यात आले. यावेळी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? चला, जाणून घेऊया…

एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis ) म्हणाले, “पूर्वी उपलब्ध असलेली सर्व माहिती काेणाच्या तरी सांगण्यावर आधारित होती. मात्र, नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगितले आहे. सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे बरोबर आहेत की, नाही ते तपासले जात आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे त्याच्या निकालावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही.”

सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईतील घरातील पंख्याला गळफास लावून आत्म’हत्या केली. अशात काही लाेकांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते, तर अनेक लोक सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील सध्याच्या नेपोटिज्मला जबाबदार मानू लागले. सुशांतच्या चाहत्यांना त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय पाहिजे आहे. इतकेच नव्हे, तर सुशांतच्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतची एक्स मॅनेजर होती. दिशाचा 9 जून 2020 रोजी दुपारी 2च्या सुमारास इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. बोरिवली पोस्टमॉर्टम सेंटरमध्ये दिशाचे पोस्टमॉर्टम करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यावर दिशाच्या मृत्यूला डोक्याला मार आणि अनेक अनैसर्गिक जखमा कारणीभूत असल्याचे समोर आले. कारण, ती 14 व्या मजल्यावरून खाली पडली होती आणि दिशाला अनेक दुखापती झाल्या होत्या.(bollywood actor sushant singh rajput disha salian case under investigation devendra fadnavis shares big update)

हे देखील वाचा