Tuesday, April 23, 2024

“माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद” महाराष्ट्र शाहीर सिनेमातून अभिनयात पदार्पण करणाऱ्या सना शिंदेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

नुकताच संपूर्ण महाराष्ट्राला ज्या सिनेमाची मागील अनेक दिवसांपासून तो ‘महाराष्ट्र्र शाहीर’ सिनेमा प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला भुरळ तर घातलीच सोबतच कलाकार आणि राजकीय नेत्यांना देखील या सिनेमाने आकर्षित केले आहे. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘महाराष्ट्र्र शाहीर’ सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे तर केदार शिंदे यांची लेक असलेली सना शिंदे ही शाहिरांच्या पहिल्या पत्नीची भानुमतीची भूमिका साकारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sana Kedar Shinde (@sanashinde)

केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू असून, त्यांनी आपल्या आजोबांचा जीवनपट पडद्यावर दाखवण्याचा केलेला प्रयत्न सर्वानाच चांगलाच भावला आहे. महाराष्ट्र्र शाहीर या सिनेमाच्या माध्यमातून सना मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. याच अनुषंगाने तिने सोशल मीडियावर एक फोटो आणि एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये ती तिच्या पणजी आजीसोबत अर्थात शाहिरांच्या दुसऱ्या पत्नीसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “काल माझी पणजी असलेल्या म्हणजेच माझ्या ‘माई’ ने महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा पाहिला. मी तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याची खूपच उत्सुकता होती. हा फोटो माझ्या नकळत काढलेला आहे. या फोटोमध्ये माझ्या चेहऱ्यावर असलेला आनंद कायम लक्षात राहावा म्हणून अंकुश चौधरीने हा फोटो काढला आहे.

तिने मला भानुमतीशी असलेल्या तिच्या नात्याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या. हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा होता. असच अजून शिकत राहीन, प्रामाणिकपणे काम करत राहीन.॥ श्री स्वामी समर्थ ॥.” सनाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत सिनेमातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अंकुश चौधरी आणि सना शिंदेसोबतच अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांच्या आणि इतर अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा