अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही मराठी इंडस्ट्रीमधील एक नावाजलेला चेहरा आहे. तिने अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम करून, चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. अभिनयाशिवाय ही अभिनेत्री आपल्या ठाम मतांसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठीही चर्चेत असते.
अलिकडेच अभिनेत्रीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्यावर पोस्टद्वारे आक्षेपार्ह कवन केले होते. ही पोस्ट व्हायरल होताच केतकीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, अशी आक्षेपार्ह पोस्ट करणे केतकीला चांगलेच महागात पडल्याचं दिसत आहे. होय, या पोस्टवरून नवी मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता, ज्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली. (ketaki chitale detained by police in case of hateful post on sharad pawar)
ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार #ketakichitale ला घेतले ताब्यात #केतकीचितळे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2022
राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी केतकी चितळेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तिच्याविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.
अभिनेत्रीला ताब्यात घेत असतानाही लोकांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. निषेधार्थ यावेळी लोकांकडून अभिनेत्रीच्या अंगावर शाई आणि अंडी फेकण्यात आली. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, या पोस्टमुळे लोक किती संतापले आहेत.
काय होतं नेमकं प्रकरण?
केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाऊंटवर अभंगाच्या भाषेत रचना केलेले एक काव्य पोस्ट केले होते. ज्यात भाषा आणि शब्द रचना याचा अर्थ लावल्यास, थेट शरद पवार यांनाच टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले.
“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave”
महत्त्वाचे म्हणजे, केतकीची आपल्या वादग्रस्त विधानांमुळे वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अभिनेत्रीवर चौफेर टीका करण्यात आली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा