×

पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला रुपाली ठोंबरे पाटलांचे खडे बोल, म्हणाल्या…

टेलिव्हिजन अभिनेत्री केतकी चितळे तिच्या अभिनय कारकिर्दीपेक्षा तिच्या विवादित आणि फटकळ वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. केतकी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टींवर तिचे स्पष्ट आणि परखड मतं मांडत असते. अनेकदा तिला तिच्या या व्यक्तव्यांमुळे मोठ्याप्रमांवर ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो, मात्र असे असूनही ती तिचे मतं मांडणे थांबवत नाही. नुकतेच तिचे तिच्या पोस्टमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तिच्या या पोस्टवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप घेत केतकी चितळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून खडेबोल सुनावले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ” चि चि चवताळीस बाई तू
महिला असली तरी छपरीच तु, संस्कार नसलेली केतकी, इतकीशी कशी चवताळीस, हरामखोर विकृती,मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे. कशात ना मशात केतकीबाई तमाशात ,
लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला, मिळणारच बाई तुला चोप. #सडकी #केतकी #चितळे” त्यांच्या या पोस्टवर आता नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत असल्या तरी केतकीने अजून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता रुपाली यांच्या या पोस्टवर केतकी काय म्हणते ते पाहणे महत्वाचे ठरेल.

तत्पूर्वी केतकीने तिच्या पोस्टमध्ये काय लिहिले होते जाणून घेऊया. केतकी चितळेने तिच्या पोस्टमध्ये एक काव्य पोस्ट केले आहे. हे काव्य ॲड.नितिन भावे नामक व्यक्तीचे असल्याचे दिसत असले तरी केतकीने स्वतःच्या अकाउंटवर ही पोस्ट केल्याने तिच्यावर सध्या टीका केली जात आहे.

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave”

दरम्यान केतकीला सुनावणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील या कोण आहेत जाणून घेऊया?
रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका होत्या. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले होते. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांना शहराध्यक्ष पदावरुन काढत राज्य उपाध्यक्ष पद दिले होते. डिसेंबरमध्ये त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून मनसेचा राजीनामा दिला आणि अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post