गेल्या काही महिन्यांपासून मराठी अभिनेत्री केतकी चितळे (ketaki Chitale) चांगलीच चर्चेत आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकी चितळेवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर केतकी चितळेला ४१ दिवस पोलिस कोठडीतही राहावे लागले होते. नुकतीच तिची जामिनावर सुटका सुटण्यात आली होती. परंतु आता बाहेर आल्यानंतरही केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
केतकी चितळे ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम करणारी केतकी आपल्या अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानांसाठीच जास्त ओखळली जाते. काही महिन्यांपूर्वीच तिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केल्याने अडचणीत आली होती. या प्रकरणात केतकीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. केतकीच्या या पोस्टमुळे राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
त्यामुळेच केतकीच्या अटकेनंतर तिच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. यावेळचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. केतकीवर झालेल्या शाईफेकीने तिचे कपडे, ब्लॉऊज खराब झाले होते. परंतु आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केतकीने त्या शाई लागलेल्या ब्लॉऊजचे रुपचं बदलून टाकले आहे. शाई लागलेल्या ब्लाऊजवर तिने सुंदर नक्षीकाम केले आहे. ज्याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओच्या सुरूवातीला केतकीने शाई फेक झाल्यानंतर खराब झालेल्या ब्लाऊजचे फोटो दिसत आहेत. त्यानंतर ती शाईने खराब झालेल्या ब्लाऊजवर नक्षीकाम करताना दिसत आहे. या नक्षीकामातून तिने त्या जागी त्रिशुळ बनवलेले दिसत आहे. तिच्या या धाडसाचे अनेकांनी कौतुक केले आहे तर काही जणांनी तिच्यावर टिकाही केली आहे. तुझ्या हिंमतीला दाद द्यायला पाहिजे अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा –
काळीज तोडणारी बातमी! सिनेविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, चाहते शोकसागरात
‘या’ कारणामुळे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या मागे लागले पॅपराजी, व्हिडिओ व्हायरल










