Friday, February 3, 2023

‘केजीएफ चॅप्टर २’च्या पहिल्या गाण्यातून दिसली रॉकी भाईची ‘तुफानी’ झलक

मागील काही काळापासून दाक्षिणात्य चित्रपटांनी सर्वच प्रादेशिक आणि बॉलिवूडच्या चित्रपटांना प्रसिद्धी लोकप्रियता आणि कमाईच्या बाबीत मागे टाकत आघाडी घेतली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांची नस ओळखली आणि त्यानुसार चित्रपट बनवून त्यांचे मनोरंजन केले. या चित्रपटांमधली ऍक्शन, ड्रामा, कलाकारांचा अभिनय, त्यांची स्टाईल सर्वच अगदी दिलखेचक असते. त्यामुळेच या सिनेमांची लोकांमधील क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. २०१८ साली असच एक साऊथ सिनेमा प्रदर्शित झाला होता ‘केजीएफ’ (KGF) या सिनेमाने लोकप्रियतेचे, प्रसिद्धीचे आणि कमाईचे शिखर गाठले होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग केजीएफ चॅप्टर २ (KGF Chapter 2) लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच फॅन्समध्ये सिनेमाबाबत खूपच उत्साह दिसून येत आहे.

येत्या १४ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रतिक्षा लोकं मागील काही महिन्यांपासून करत आहे. आता लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, सिनेमाचे प्रमोशन देखील चालू झाले आहे. तत्पूर्वी नुकतेच या सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. गाण्याचे नाव आहे ‘तुफान’. या गाण्यातून प्रेक्षकांना रॉकी भाईची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. गाण्याचे बिट्स अतिशय एनर्जेटिक असून, रिदम देखील दमदार आहे. हे गाणे चित्रपटातील यशाच्या भूमिकेला पूर्ण न्याय देताना दिसत आहे. चित्रपटात यश गरिबांचा देवदूत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

केजीएफ चॅप्टर २ हा एक पण इंडिया सिनेमा असून, चित्रपटाला कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित केले जाणार आहे. सिनेमातील पहिले ‘तुफान’ गाणे पाचही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला रवी बसर यांनी संगीत दिले असून, शब्बीर अहमद यांनी शब्द लिहिले आहे. तर ब्रिजेश शांडिल्य, मोहन कृष्ण, लक्ष्मण दत्ता नाईक आदी अनेक गायकांनी गाण्याला आवाज दिला आहे.

सिनेमाचा टिझर आधीच प्रदर्शित झाला असून ट्रेलर २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. केजीएफ हा एक पिरियड ड्रामा आहे ज्यात ७०/८० च्या दशकातील कहाणी दाखवण्यात आली आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागात संजय दत्त ‘अधीरा’ हा खलनायक साकारत असून रविना टंडन या सिनेमात राजकारणाच्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ सिनेमाचा पहिला भाग २०१८ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळाला त्यानंतर अभिनेता यशाच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आणि तो जागतिक स्टार झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा