‘रामायण’ चित्रपटासंदर्भातील काही ना काही बातम्या रोजच सोशल मीडियावर येत असतात. आता या चित्रपटाबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे की, ‘केजीएफ’ स्टार यशने ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पण तरीही त्याला या चित्रपटाशी जोडायचे आहे, त्यामुळे त्याने या चित्रपटाचा सहनिर्माता बनण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यशचे चाहते दु:खी झाले आहेत. कारण त्याला यशला आणखी एका दमदार भूमिकेत बघायचे होते.
‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या लोकांवर चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी खूप नाराज आहेत. हे थांबवण्यासाठी नितीश यांनी सेटवर फोन आणण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपट निर्माते नितेश तिवारी यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात रणबीर कपूर रामची भूमिका साकारणार आहे, तर साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत आणि सनी देओल रामभक्त हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी या चित्रपटाशी संबंधित बातम्या समोर आल्या होत्या की, यश चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. पण आता मीडिया रिपोर्ट्सनुसार यशने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यास स्पष्ट नकार दिला असला तरी तो या चित्रपटाचा निर्माता नक्कीच आहे.
हाती मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता यशने ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यास साफ नकार दिला आहे, तर यशला या भूमिकेसाठी 80 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण आता यश ‘रामायण’ चित्रपटाचा सहनिर्माता असणार आहे.
‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित काही ना काही माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशने चित्रपटात रावणाची भूमिका करण्यास नकार दिल्यानंतर या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याला घ्यायचे याचा विचार सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटात कुंभकरणच्या भूमिकेसाठी बॉबी देओलसोबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, विजय सेतुपती ‘रामायण’ चित्रपटात रावणाचा धाकटा भाऊ विभीषणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचीही बातमी समोर आली आहे. अभिनेत्री लारा दत्ता माता कैकईच्या भूमिकेत तर शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत दिसणार आहे. अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
खूप वर्षांनी ‘वीरझारा’ चित्रपट पाहताना करण जोहर भावुक, यश चोप्रा यांच्या आठवणीत लिहिली खास पोस्ट
सुंबूल तौकीरच्या वडिलांनी ऑनलाइन ट्रोल्सविरोधात दाखल केली एफआयआर, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल