Wednesday, June 11, 2025
Home बॉलीवूड केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

जवळपास सर्वच प्रेक्षकांना सेलिब्रिटींच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर भरभरून प्रेमही करतात. सर्वांचा आवडता केजीएफ स्टार ‘यश’ हल्ली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. तो त्याच्या चाहत्यांसाठी अनेक गोष्टी शेअर करत असतो. त्याचा मुलासोबतचा नुकताच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एका चांगल्या अभिनेत्यासोबतच यश त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक जबाबदार आणि प्रेमळ वडील आहे. तो त्याच्या कामाच्या व्यापातूनही त्याच्या कुटुंबासाठी वेळ काढत असतो. त्याच्या मुलासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. सगळे चाहते त्याच्याइतकेच त्याच्या कुटुंबाला देखील प्रेम देतात.

यशने 5 मार्चला त्याचा मुलगा यथर्व सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सरप्राईझ दिले आहे. यामध्ये तो त्याच्या मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये यथर्व एरोप्लेन बोलण्याचा प्रयत्न करतो असतो, पण यशला तो काय बोलत आहे, हे अजिबात समजत नाही. शेवटी तो हाताने इशारे करून सांगतो, तेव्हा यशला समजते की, त्याला नक्की काय म्हणायचे आहे. बाप- लेकाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच प्रेम मिळत आहे.

यश आपल्या कुटुंबाला खूप वेळ देतो मागच्याच महिन्यात तो संपूर्ण कुटुंबासोबत मालदिवला सुट्ट्या एंजॉय करायला गेला होता. यश आणि त्यांची पत्नी राधिका या दोघांनीही फोटो शेअर करून ही माहिती दिली होती.

यश हा मुळात कन्नड अभिनेता आहे. त्यानंतर साऊथमध्ये काम करून त्याने सर्वत्र आपले नाव कमावले. ‘केजीएफ’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे की, आज देशाच्या कानाकोपऱ्यात यशचे चाहते आहे. त्याचा ‘केजीएफ-2’ चा टिजर नुकताच रिलीझ झाला आहे. त्यामुळे याबाबत चाहत्यांच्या मनातील उत्सुकता खूपच वाढली असून ते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची वाट बघत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

-‘सीरियल किसर’ इमरान हाशमीच्या ‘या’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री मोनालिसा, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

-‘फ्लाय’ गाण्यातून पहिल्यांदाच आली बादशाह-शेहनाजची केमेस्ट्री चाहत्यांसमोर, पाहा युट्यूबर ट्रेंडिंगमध्ये असलेलं हे गाणं

हे देखील वाचा