‘खतरों के खिलाडी’मध्ये एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेतो रोहित शेट्टी; ‘हा’ आहे सर्वात महागडा स्पर्धक


टीव्हीवर अनेक मालिकांसोबतच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक रियॅलिटी शो देखील सुरू असतात. डान्स, गायन आदी वेगवेगळ्या प्रकारचे हे शो मर्यादित कालावधीसाठी असल्याने याचा प्रेक्षक वेगळा असतो. रियॅलिटी शोला मिळणारे महत्त्व आणि लोकप्रियता बघता जवळपास सर्वच चॅनेल्स शनिवार आणि रविवार हे दोन दिवस फक्त आणि फक्त रियॅलिटी शोसाठी राखीव ठेवतात. याला काही रियॅलिटी शो अपवाद देखील आहेत. अनेक रियॅलिटी शो हे हिट झाल्यानंतर दरवर्षी त्या शो चे नवनवीन पर्व चॅनेल प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात मोठा आणि भयानक अनुभव देणारा एकमेव रियॅलिटी शो म्हणजे ‘खतरो के खिलाडी.’

मागील जवळपास ११ वर्षांपासून दरवर्षी येणाऱ्या या शोचे प्रत्येक पर्व जोरदार गाजत असते. शिवाय या शो ला मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रसिद्धी देखील या शोला न चुकता दरवर्षी आणण्यासाठी महत्त्वाची आहे. यावर्षी या शोचे ११ वे पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये या कार्यक्रमाचे शूटिंग पार पडले आहे.

सोशल मीडियावरही या कार्यक्रमासंदर्भात रोज अनेक पोस्ट व्हायरल होताना आपण बघतो. या शोमध्ये सहभाग घेणारे स्पर्धकही अनेक अपडेट आपल्याला देत असतात. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आणि शोचे खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करणाऱ्या रोहित शेट्टीच्या मानधनाबद्दल सांगणार आहोत.

रोहित शेट्टी
लोकप्रिय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आणि ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा रोहित शेट्टी या शोचे सूत्रसंचालन करण्यासाठी प्रत्येक भागाचे ४९ लाख रुपये घेतो.

राहुल वैद्य
लोकप्रिय गायक आणि ‘बिग बॉस १४’चा उपविजेता असलेला राहुल प्रत्येक भागासाठी १५ लाख रुपये घेत आहे. ‘बिग बॉस’ या शोमुळे राहुलच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे.

दिव्यांका त्रिपाठी
छोट्या पडद्यावरची क्वीन म्हणून दिव्यांका ओळखली जाते. यावर्षी तिनेही या शो मध्ये सहभाग घेतला असून , ती प्रत्येक भागासाठी १० लाख रुपये घेत आहे.

अर्जुन बिजलानी
टीव्ही इंडस्ट्रीमधला हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अर्जुन या शो च्या एका भागासाठी ७ लाख रुपये घेत आहे.

निक्की तांबोळी
‘बिग बॉस’ शोमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे निक्की या शो ने तिला खूप लोकप्रियता दिली. निक्की ‘खतरों के खिलाडी’साठी ४.५ लाख रुपये एका भागासाठी घेत आहे.

श्वेता तिवारी
व्यायसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेता या शोमध्ये प्रत्येक भागासाठी ४ लाख रुपये घेत आहे.

अभिनव शुक्ला
‘बिग बॉस’चा स्पर्धक, टीव्ही आणि चित्रपटांमधील ओळखीचा चेहरा असणारा अभिनव या शोमध्ये प्रत्येक भागासाठी ४.२५ लाख रुपये घेत आहे.

अनुष्का सेन
‘बालवीर’, ‘झाँसी की राणी’ आदी मालिकांमध्ये झळकलेल्या अनुष्का सेनची खूप फॅन फॉलोविंग आहे. ती या शो मध्ये ५ लाख रुपये एका भागाचे घेत आहे.

विशाल आदित्य सिंग
विशाल देखील ‘बिग बॉस’चा स्पर्धक राहिला आहे. तो या शोमध्ये भाग घेण्यासाठी ३.३४ लाख रुपये प्रत्येक भागाचे घेत आहे.

वरुण सूद
अनेक रियॅलिटी शोचा स्पर्धक असलेला वरुण या शोमध्ये प्रत्येक भागाचे ३.८३ रुपये घेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपूर खानदानाप्रमाणेच धर्मेंद्र यांचाही होता मुलीच्या डान्स आणि चित्रपटात काम करण्याला विरोध; ‘अशाप्रकारे’ झाले तयार

-अनिल कपूरच्या ‘वो सात दिन’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; मुख्य अभिनेता म्हणून ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती

-लोकांची मदत करता- करता सोनूने सुरू केले आपले सुपरमार्केट; १० अंड्यांवर मिळतेय ‘ही’ जबरदस्त ऑफर


Leave A Reply

Your email address will not be published.