Saturday, June 29, 2024

खेसारी लाल आणि काजलचे रोमँटिक गाणे यूट्यूबवर घालतंय धुमाकूळ, मिळालेत ३ कोटींपेक्षाही अधिक हिट्स

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट जोड्यांमध्ये खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी या जोडीचा समावेश होतो. जेव्हा जेव्हा ही जोडी प्रेक्षकांसमोर येते, तेव्हा काहीतरी धमाल करूनच जात असते. या दोन कलाकारांनी एका पाठोपाठ एक अशी अनेक हिट गाणी दिली आहेत. प्रेक्षक देखील खेसारी लाल आणि काजलच्या जोडीला खूप प्रेम देतात. त्यांचा चित्रपट किंवा गाणी प्रेक्षकांना खूपच आवडतात. त्यांच्या सुपरहिट गाण्यांपैकी ‘बलमुआ हो तोहरा से प्यार हो गईल’ हे गाणे सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

या भोजपुरी गाण्याला यूट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला कल्पना आणि खेसारी लाल यादव यांनी मिळून गायले आहे. तसेच हे गाणे काजल राघवानी आणि खेसारी लाल यादव यांच्यावर चित्रित केले आहे. हे एक रोमँटिक भोजपुरी गाणे आहे. गाण्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळताना दिसत आहे.

भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये काजल राघवानी आणि खेसारी लाल यादव याची जोडी ऑनस्क्रीन खूपच धमाल करताना दिसत असते. प्रेक्षकांना देखील त्यांची जोडी खूपच आवडते. त्यांची केमिस्ट्री बॉंडिंग आणि रोमान्स प्रेक्षकांना खूप आवडतो. हेच कारण को त्यांचे कोणतेही गाणे रिलीझ होता क्षणीच व्हायरल होत असत. त्यांच्या या गाण्यात त्यांनी जबरदस्त रोमँटिक डान्स केलेला दिसत आहे.

या गाण्याला यूट्यूबवर 3.4 कोटी एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे खेसारी लाल यादव यांच्या ‘मेहंदी लगा के रखना’ या सुपरहिट चित्रपटामधील आहे. या चित्रपटातील जवळपास सगळीच गाणी सुपरहिट झाली आहेत.

विशेष म्हणजे हे गाणे 8 फेब्रुवारी, 2018 रोजी अनन्या क्राफ्ट एँड व्हिजन म्युझिक या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा