Friday, November 22, 2024
Home भोजपूरी खेसारी लाल यादवने पवन सिंगची उडवली खिल्ली, ‘दारू पिऊन कोणीही स्टेजची प्रतिष्ठा…’

खेसारी लाल यादवने पवन सिंगची उडवली खिल्ली, ‘दारू पिऊन कोणीही स्टेजची प्रतिष्ठा…’

भोजपुरी सिनेसृष्टीतील दोन सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि पवन सिंग यांनी फिल्मी दुनियेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दोघांची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. या दोघांचे एखादे गाणे प्रदर्शित झाले की, चाहते ते मोठ्या आवडीने ऐकतात. मात्र, एकेकाळी जवळचे मित्र असलेले पवन आणि खेसारी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत.

खेसारी-पवनचे शाब्दिक युद्ध
अलीकडेच पटणा येथील एका कार्यक्रमात पवनने (Pawan Singh) खेसारीचे (Khesari Lal Yadav) नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. माध्यमांतील वृत्तांनुसार, पवन खेसारीवर निशाणा साधताना म्हणाला की, “कोणी इकडे जात आहे, तर कोणी तिकडे जात आहे, ज्याला जिकडे जायचे आहे, आम्ही तिथे केव्हाच काम करून आलो आहोत.” यासोबत त्याने स्वत:ची प्रशंसा करत म्हटले की, “असे लोक कल्पनाही करू शकत नाहीत की, पवन सिंग कुठे- कुठे गाणे म्हणेल.” पवनच्या या वक्तव्यावर खेसारीनेही प्रत्युत्तर दिले आहे.

खेसारी म्हणाला की, “स्वत:ला मोठे बनवा आणि भोजपुरी इंडस्ट्रीलाही. काही लोकांना माझे नाव मोठे होत असल्यामुळे समस्या आहे.” खेसारीने पवनची खिल्ली उडवली आणि म्हणाला, “व्यक्तीने स्वच्छ मनाने मंचावर जावे. दारू पिऊन कोणीही स्टेजची प्रतिष्ठा खराब करू नये. दारू पिऊन कुठेही जाणे ही चांगली गोष्ट नाही.” खेसारी पुढे म्हणाला, “काही लोकांना वाटते की, जग त्यांच्या इशाऱ्यावर चालतं.”

पवन सिंगने भोजपुरी पॉप अल्बम गायक म्हणून काम केले आहे. त्याचा पहिला अल्बम ‘ओधनिया वाली’ १९९७ मध्ये आला आणि त्यानंतर २००५ मध्ये ‘कांच कसैली’ आला. २००८ मध्ये त्याने ‘लॉलीपॉप लागेलू’ (शीर्षक गीत) हा अल्बम प्रसिद्ध केला. पवनला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘लॉलीपॉप लागेलू’ने ओळखले गेले. हे गाणे प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले. त्याच्या २००७ च्या चित्रपट सह ‘गल्ली चुनारिया तोहरे’ नावाने त्याने पहिली प्रमुख भूमिका साकारली.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा