जान्हवी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. फार कमी काळात तिने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. तिची लहान बहीण खुशी कपूर ही देखील आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल सांगितले होते. जान्हवी कपूर प्रमाणेच खुशी कपूर ही देखील सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
खुशीने जरी बी-टाऊनमध्ये पाऊल ठेवले नसले, तरी तिची स्टाईल आणि हॉटनेसच्या बाबतीत आपल्या बहिणीपेक्षा ती कमी नाहीये. त्या दोघींचे एकमेकींसोबत घट्ट नाते असून त्या दोघी कायम एकमेकींच्या जवळ असतात. खुशी कपूर लहानपणापासूनच आपल्या ग्लॅमरस अंदाजात दिसली आहे. तिचे असे अनेक फोटो आहेत ज्या फोटोत तिची हटके स्टाईल आणि हॉटनेस लपून राहत नाही.
जान्हवी कपूरचा काल (६ मार्च) वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने खुशीने जान्हवीसाठी एक व्हिडिओ आणि फोटो कोलाज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात तिने जान्हवीसाठी गोड शब्दात संदेश लिहिला आहे. सोबतच तिला विशेष फील करण्यासाठी त्यांच्या बालपणीचा एक व्हिडिओ शेयर केला, ज्यात ती नाचत आहेत. तिने कॅप्शनमध्ये तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते’ असे लिहिले आहे.
एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन असो, वा एखादा कार्यक्रम त्या दोघी एकमेकांसोबत दिसत असतात. आपले फोटो एकमेकांसोबत शेयर करत असतात. एखाद्या पार्टीत हजर राहताना त्या दोघींची स्टाईल आणि लूक नेहमी हटके असतो.
मध्यंतरी खुशी कपूर सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. तिच्या एका व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. यात ती राणी मुखर्जीच्या एका चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसली होती. त्यात ती आपल्या मैत्रिणींसोबत एका संवादावर जबरदस्त हावभाव करताना दिसली होती. तिच्या त्या व्हिडिओला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शविली होती. खुशीने न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.
जान्हवी कपूरने आपल्या धडक चित्रपटातून बॉलिवूडममध्ये पदार्पण केले होते. तिचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. गुंजन सक्सेना या चित्रपटात ती कारगिल मुलीची भूमिका साकारताना दिसली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा–
-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा
-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा










