कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वजण एकमेकांना काळजी घेण्यासाठी सांगत आहे. अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांना सुरक्षित राहण्यास सांगत आहेत. नुकताच पर्यावरण दिन साजरा केला आहे. अनेकांनी वृक्षारोपण करून हा दिवस साजरा केला आहे. तसेच कलाकारांनी सोशल मीडियावरून सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यातच बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी हिने देखील एक व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कियाराने तिचा एक थ्रो बॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नियॉन कलरची बिकिनी घालून समुद्रात पोहताना दिसत आहे.
कियाराने हा व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस आहे.” तिला या व्हिडिओमध्ये पाहून तिच्या चाहत्यांना जलपरीची आठवण आली आहे. अनेक युजर या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये कियारा समुद्राच्या आतील सौंदर्य कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहे. तर मध्येच माश्यांसोबत पोहतानाही दिसत आहे.
या आधी देखील कियाराने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती समुद्राच्या आतमध्ये पोझ देताना दिसत होती. हा फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “तुम्ही येणाऱ्या लाटांना थांबवू शकत नाही पण तुम्ही पोहायला शिकू शकता.” तिचा हा फोटो देखील खूप चर्चेत होता.
कियारा आडवाणीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती एका नंतर एक अनेक चित्रपटात दिसणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ‘शेरशाह’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षापर्यंत प्रदर्शित होणार आहे. तसेच ती कार्तिक आर्यन सोबत ‘भुल भुलय्या २’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. ती ‘जुग जुग जियो’ मध्ये काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…