‘या’ दिग्गज अभिनेत्रीची बायोपिक करू ईच्छिते कियारा आडवाणी; चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले तिचे ‘ड्रीम’


बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी हीने शोबिज इंडस्ट्रीमध्ये नुकतेच ७ वर्ष पूर्ण केले आहे. या आनंदात तिने एक सेलिब्रेशन केले आहे. यासोबत तिने तिच्या देशभरातील अनेक चाहत्यांशी संवाद साधला आहे. या सेशन दरम्यान तिच्या चाहत्यांनी तिला तिचे चित्रपट, आवडीचे कलाकार आणि भविष्यातील अनेक प्रोजेक्टबद्दल माहिती विचारली. तिने तिच्या करिअरबद्दल देखील बातचीत केली आहे. कियाराची सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोविंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे १७.५ मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत.

कियाराचे या सेशन दरम्यान देशभरातील विविध भागांमधून ४० फॅन पेज तिच्यासोबत जोडलेले होते. वेगवेगळ्या वयोगटातील तिचे हे चाहते होते. या दरम्यान तिच्या एका चाहत्याने त्या भूमिकेबद्दल विचारले जी तिला भविष्यात करायला आवडेल. यावर तिने उत्तर दिले की, तिला अभिनेत्री मधुबाला यांची बायोपिक करायला जास्त आवडेल. तिने सांगितले की, हे तिचे एक स्वप्न आहे. या सगळ्या गोष्टी तिने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. (Kiara Adawani wants to play Madhubala’s biopic in future)

कियाराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने १३ जून २०१४ साली आलेल्या ‘फुगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनतर तिने ‘एम एस धोनी’, ‘भारत अने नेनु’, ‘कबीर सिंग’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘गिल्टी’, ‘गूड न्यूज’, ‘इंदू की जवानी’ या चित्रपटात काम केले. या काळात तिने स्वतःला सिद्ध केले आहे. यानंतर ती खूप चर्चेत आली. तिच्या सोशल मीडियावर फॅन फॉलोवर्सच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ झाली.

या आधी तिने शेवटच्या वेळेस कॉमेडी चित्रपट ‘इंदू की जवानी’मध्ये आदित्य सिल आणि मल्लिका दुवासोबत काम केले आहे. ती सध्या बॉलिवूड मधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्याकडे अनेक चित्रपटाच्या ऑफर आहेत. येणाऱ्या काळात ती ‘शेरशाह’, ‘भूल भूलैया २’, ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता? वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला

-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज

-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित


Leave A Reply

Your email address will not be published.