Friday, July 12, 2024

कियारा अडवाणीने सिद्धार्थला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शुभेच्छा देतांना कियाराने सिद्धार्थला म्हटले…

नुकताच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने (Sidharth Malhotra) त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला फॅन्सकडून आणि कलाकारांकडून भरभरून शुभेच्छा मिळाल्या. त्याच्या अवाढदिवसाच्या दिवशी अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत, त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये एका व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे आणि सोबतच मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या शुभेच्छा आहे अभिनेत्री कियारा अडवाणींच्या (Kiara Advani). कियाराने देखील सिद्धार्थला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हटके आणि आकर्षक पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी ‘शेरशहा’ हा सिनेमा एकत्र केला. त्यानंतर त्यांच्या अफेयरच्या चर्चा जोरदार रंगायला सुरुवात झाली होती. सिद्धार्थ आणि कियाराने कधीही त्यांचे नाते मीडियासमोर नाकारले नाही किंवा स्विकारले देखील नाही. त्यांना अनेकदा पॅपराजीनी एकत्र स्पॉट देखील केले, त्यांच्या नात्यावर विविध बातम्या देखील आल्या. मात्र तरीही त्यांनी त्यांचे खरे नाते जगासमोर आणले नाही. मात्र सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना कियाराने तिचे त्याच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले आहे.

Photo Courtesy: Instagram/kiaraaliaadvani

कियाराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा आणि सिद्धार्थचा ‘शेरशहा’ सिनेमातील एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये कियारा सिद्धार्थच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “माझ्या सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.” यासोबतच तिने हार्ट ईमोजी देखील पोस्ट करत सिद्धार्थला तिची पोस्ट टॅग केली.

सिद्धार्थ आणि कियारा यांनी कधीच त्यांच्यात असलेल्या नात्यावर मीडियामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने त्यांचे मत मांडले. मात्र त्यांना अनेकदा यासोबत स्पॉट केले गेले. नुकतेच नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांना जंगल सफारी करताना पाहिले गेले. एका मुलाखतीमध्ये कियाराने सिद्धार्थला तिचा जवळचा मित्र सांगितले होते. सिद्धार्थ लवकरच ‘मिशन मजनू’ सिनेमात दिसणार असून, कियारा ‘भूल भुलैया 2’ आणि ‘जुग जुग जियो’मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा