Sunday, July 14, 2024

बॉलिवूडमध्येही होता सुचित्रा सेन यांच्या अदांचा बोलबाला, राज कपूर यांच्या चित्रपटाची ऑफर लावली त्यांनी धूडकावून

बॉलिवूड म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येतात या क्षेत्रात वर्चस्व असलेले मोठेमोठे अभिनेते. पहिल्यापासुन हिंदी चित्रपटसृष्टीवर पुरुष कलाकारांनीच जास्तीत जास्त वर्चस्व गाजवले आहे. परंतु यामध्ये काही अशाही अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांच्या अभिनयाच्या जादुने त्या काळातील दिग्गज अभिनेत्यांनपेक्षाही जास्त मानधन घेतले होते. या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे सुचित्रा सेन (Suchitra Sen). ६०च्या दशकात सुचित्रा सेन यांची लोकप्रियता इतकी होती की त्या अभिनेत्यांपेक्षाही जास्त मानधन घेत होत्या. सोमवारी (१७ जानेवारी) त्यांची पुण्यतिथी आहे. या जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल…

सुचित्रा सेन यांनी हिंदी आणि बंगाली सिनेमामध्ये आपल्या अभिनयाने एक काळ चांगलाच गाजवला आहे. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. आपल्या कसदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने त्यांनी प्रत्येकाला वेड लावले होते. यामुळेच त्यांनी असंख्य चाहते कमावले.

सुचित्रा यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ला पूर्व बांग्लादेशमधील पबना जिल्ह्यात झाला होता. रोमा दास हे त्यांचे खरे नाव. त्यांचे वडील करुणोमय दास हे एका शाळेत मुख्याध्यापक होते. पबनामधूनच सुचित्रा यांनी आपले शिक्षण पुर्ण केले. त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. मात्र त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला लग्नानंतर खरी सुरुवात झाली. १९४७ मध्ये बंगालचे प्रसिद्ध उद्योगपती अदिनाथ सेन यांचा मुलगा दीबानाथ सेनशी त्यांनी लग्न केले. लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांना पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. त्याच वर्षी त्यांचा ‘सारे चतूर’ नावाचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीतील आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला.

सुचित्रा सेन यांनी अभिनेते उत्तम कुमार यांच्यासोबत तब्बल ३० चित्रपटात एकत्र काम केले होते. म्हणजेच त्यांच्या ६१ चित्रपटांपैकी ३० चित्रपट हे त्यांनी एकाच अभिनेत्यासोबत केले होते. त्या काळात त्यांच्या अभिनयाची जादू अशी होती की, अनेक बॉलिवूड दिग्दर्शकही त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक होते. ही संधी त्यांना १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ चित्रपटाने मिळाली. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्यांना दिलीप कुमारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यामधील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या मागे चित्रपटांची जणू रांगच लागली!

चित्रपटांसोबतच त्यांच्या मानधनाबाबतही त्या खूप चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या १९६२ मध्ये आलेल्या ‘बिपाशा’ चित्रपटासाठी त्यांना नायकापेक्षाही जास्त मानधन मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. असे म्हणतात की, या चित्रपटासाठी त्यांना १ लाख रुपये मिळाले होते, तर अभिनेते उत्तम कुमार यांना फक्त ८० हजार मिळाले होते.

त्यांच्या अभिनयाची जादूच अशी होती की, त्यांना कधी निर्मात्यांच्या मागे फिरावे लागले नाही. ज्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी इतर अभिनेत्री उत्सुक असायच्या. त्यांचे चित्रपट त्या धुडकाउन लावत होत्या. इतकच नव्हे, तर त्यांनी अभिनेते राज कपूर यांनाही एका चित्रपटासाठी नकार दिला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

‘प्रणोय पाश’ या चित्रपटानंतर त्यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. त्यांना पद्यश्री पुरस्कारही देण्यात आला आहे. २०१४ मध्ये त्यांच निधन झाले.

हेही वाचा :

हे देखील वाचा