Thursday, April 25, 2024

आईकडून हजार रुपये घेऊन शाहरुख गौरीच्या शोधात आला होता मुंबईत, आज वर्षाकाठी कमावतो ‘इतके’ कोटी

हिंदी चित्रपटसृष्टीतील ५५ वर्षीय सुपरस्टार शाहरुख खान गेल्या २५ वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. कदाचित म्हणूनच त्याला ‘किंग खान’ असे म्हटले जाते. १०० हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या शाहरुखला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. आतापर्यंत १४ फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावावर आहेत. फ्रान्स सरकारने शाहरुख खानला कला पुरस्कारही दिला आहे. शाहरुखचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. एकेकाळी ताजमहालला ५० रुपये पगार घेऊन पोहोचलेला शाहरुख खान आता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.

तो केवळ चित्रपटांमधूनच नाही, तर जाहिरातींमधून देखील लाखो रुपये कमवतो. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहरुखच्या प्रत्येक चित्रपटाची कमाई तब्बल २५ कोटी रुपये इतकी आहे. एकेकाळी आईकडून हजार रुपये घेऊन त्याची प्रेमिका गौरीच्या शोधात मुंबई शहरात पोहोचलेल्या शाहरुख खानचा आज मुंबईत स्वतःचा आलिशान बंगला आहे.

तो आता आलिशान आयुष्य जगतो आणि त्याच्याकडे कार आणि बाईक्सचा चांगलाच संग्रह आहे. चित्रपटात काम करण्यापूर्वी त्याने टीव्ही शोमध्येही काम केले होते. त्याच्या पहिल्या टीव्ही सीरियलचे नाव ‘फौजी’ होते. ज्यात शाहरुखने एका सैनिकाची भूमिका केली होती. ही मालिका १९८९ मध्ये आली होती. दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शाहरुख खानचा बंगला ‘मन्नत’ जगातील टॉप १० बंगल्यांमध्ये समाविष्ट आहे. हा बंगला पूर्ण पांढऱ्या संगमरवरने (व्हाइट मार्बल) बनवलेला आहे.

त्याचा बंगला ‘मन्नत’ पाहण्यासाठी दररोज लाखो लोक तेथे येतात. ज्याची किंमत तब्बल २५० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. शाहरुख खान ५०६७ कोटींच्या एकूण संपत्तीचा मालक आहे. त्याचे मासिक उत्पन्न २० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

‘मन्नत’ व्यतिरिक्त, शाहरुख खानचे दुबईमध्ये स्वतःचे घर आहे. ज्याची किंमत २०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. दुबई व्यतिरिक्त शाहरुखचे लंडनमध्येही स्वतःचे घर आहे. जे त्याने २००९ मध्ये खरेदी केले होते. त्याची किंमत २०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. १९९२ मध्ये ‘दीवाना’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणारा शाहरुख सध्या जगातील अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की, शाहरुख खानची संपत्ती २०२५ पर्यंत १ अब्ज डॉलर असेल.

शाहरुखचा जन्म २ नोव्हेंबर, १९६५ रोजी दिल्लीत झाला होता. एकेकाळी बॉलिवूडचा हा किंग वडिलांसोबत दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कॅन्टीन चालवत होता. यादरम्यानच शाहरुख अभिनयाकडे वळला. त्याच्या आई- वडिलांचे नाव लतीफ फातिमा खान आणि ताज मोहम्मद खान आहे. त्याचे बालपण बेंगळुरूमध्ये गेले. जेथे त्याचे वडील मुख्य अभियंता होते. त्याला ५५५ नंबर खूप आवडतो. शाहरुखच्या सर्व वाहनांच्या नंबरमध्ये ५५५ येतोच.

जर आपण शाहरुख आणि गौरीच्या प्रेमाबद्दल बोललो तर, दोघेही पहिल्यांदा एका पार्टीमध्ये भेटले होते. जिथे शाहरुख पहिल्या नजरेतच गौरीच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी शाहरुखचे वय १९ आणि गौरीचे १४ वर्षे होते. गौरी आणि शाहरुखच्या प्रेमकहाणीचे उदाहरण इंडस्ट्रीमध्ये दिले जाते. पहिल्या भेटीत जेव्हा शाहरुखला गौरीशी बोलायचे होते, तेव्हा तिने आपला प्रियकर बाहेर वाट पाहत असल्याचे सांगून नकार दिला होता. गौरीचा भाऊ बाहेर वाट पाहत होता. शाहरुखला जेव्हा कळले की, गौरी त्याच्याशी खोटे बोलते, तेव्हा त्याने गौरीला आपली बहीण बनवण्याबद्दल विनोद केला. हळूहळू दोघांचे अफेअर सुरू झाले. नंतर शाहरुखला न कळवता गौरी तिच्या मित्रांसोबत मुंबईला गेली. यानंतर शाहरुखही आईकडून हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईला आला. अफेअर सुमारे ५ वर्षे चालल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितले, पण गौरीच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. कारण गौरी हिंदू आणि शाहरुख मुस्लिम होता. शेवटी दोघांच्या प्रेमापुढे त्यांना झुकावे लागले आणि दोघांनी लग्न केले.

शाहरुख आणि गौरीला ३ अपत्य आहेत. त्यांचे नाव सुहाना, आर्यन आणि अबराम आहे. अबरामचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जाणून घ्या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला, बिग बॉस ओटीटी गाजवणारा ‘तुम बिन’ फेम अभिनेता राकेश वशिष्ठबद्दल

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

हे देखील वाचा