Monday, June 17, 2024

‘चित्रपट गाजला तर नाव मिळते, मालिका चालली तर पैसा आणि नाटक…’ मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते किरण माने यांनी मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नाटकाचे महत्त्व सांगितले आहे. किरण माने सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ते सतत सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांचे मत मांडत असतात. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीत चर्चेत आली आहे.

किरण माने (Kiran Mane ) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “सिनेमा गाजला, तर तुम्हाला नांव देतो. टीव्ही मालिका चालली, तर तुम्हाला पैसा देते… ‘नाटक’ फक्त जीव लावून केलंत, तरी तुमचं अवघं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं. रंगभूमीनं काय दिलं नाही??? रंगभूमीनं ओळख दिली. आत्मविश्वास दिला.. भवतालाचं, समाजाचं भान दिलं. भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच ‘बोली’चा गोडवाही दिला. उच्च अभिरूचीचं वरदान दिलं.सांस्कृतीक श्रीमंती दिली. रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला प्रचंड आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं. अजून काय पाहिजे? सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

किरण मानेंच्या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांनी त्यांना रंगभूमीवरच्या त्यांच्या कामाबद्दल कौतुक केलं आहे. पोस्ट करताना एकाने लिहिले की, “तुम्हाला नवीन नाटकात बघायला आवडेल आम्हाला.” तर दुसऱ्याने लिहिले की,”सर्व कलाकारांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. किरण दादा तुमची सामाजिक प्रगल्भताअशीच वाढत जाओ हि प्रार्थना.” यावर अनेक कमेंट आल्या आहेत.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये अनेक नाटकांचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘उलट सुलट’, ‘मायलेकी’, ‘चल तुझी सीट पक्की’, ‘झुंड’, ‘ती गेली तेव्हा’ यांचा समावेश आहे. किरण माने हे मराठी रंगभूमीवर अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या नाटकात काम केले आहे. किरण माने हे ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे यांची भूमिका साकारत आहेत. (Kiran Mane posted the greetings of Marathi theater day and explained the importance of the play by captioning it)

आधिक वाचा-
‘तो माझा ऑफ स्क्रिन हिरो आहे, धन्यवाद बाबा’; मुलाचे शब्द ऐकून भावुक झाले मिथुन दादा
नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!

हे देखील वाचा