Friday, December 8, 2023

‘प्रेमात पडलो…’ किरण मानेंची पोस्ट चर्चेत; चाहते म्हणाले, ’52 वर्षाचा तरुण वाघ…’

सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले मराठी अभिनेते म्हणजे किरण माने होय. त्यांनी आपल्या अभिनयात्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ते सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. किरण माने यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. किरण माने यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने.

त्या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्यानंतर ते बिग बॉस मराठीच्या घरात दिसले होते. सध्या ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. किरण माने (Kiran Mane Instagram) यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चांगलच व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पोस्ट करताना किरण माने यांनी लिहिले की, 1 ऑक्टोबर…आज एक वर्ष झालं ‘बिग बाॅस’च्या त्या नादखुळा घरात पाऊल ठेवलेल्याला. अजूनबी विश्वास बसत नाय भावांनो…तब्बल शंभर दिवस टिकून राहिलो त्या घरात. या घरानं माझं आयुष्य लखलखीत करुन टाकलं… संघर्षाचं सोनं केलं… नव्हत्याचं होतं केलं… माझ्या चाहत्यांना पराकोटीचा आनंद दिला… मला पूर्वी ट्रोल करणारेबी प्रेमात पडले, चाहते झाले… द्वेष करणार्‍यांची बोलती बंद झाली… तिथनं परतल्यावर राजधानी सातार्‍यात पाऊल ठेवल्या-ठेवल्या माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी माझी जल्लोषात मिरवणूक काढली ती आयुष्यभर विसरणार नाय गड्याहो.

ह्या जादूई घरात पाऊल ठेवण्याआधी आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादळाला तोंड दिलं होतं. बलाढ्य यंत्रणेविरुद्ध जीवाच्या आकांतानं लढलो होतो. काळजावर झालेल्या खोट्या आरोपांच्या जखमा ओल्या होत्या. वेदनांनी घुसमटलो होतो. त्यामुळं आता हा माझ्यासाठी खेळ राहिला नव्हता, स्वत:ला सिद्ध करायची शेवटची संधी होती.

मी जिद्दीची, चिकाटीची, धाडसाची, स्वत्वाची, सत्वाची परीसीमा गाठली… शारीरीक-मानसिक दोन्ही बळामध्ये निम्म्या वयाच्या तरण्याबांड पोरांना जबरी टक्कर देऊन चारी मुंड्या चित केलं… ज्यांना मित्र मानलं त्यांच्यासाठी मात्र सर्वस्व उधळलं. या घरानं मला तेजस्विनी लोणारी सारखी जिवाला जीव देणारी आयुष्यभराची मैत्रीण दिली. राखीबरोबर केलेले हेल्दी फ्लर्टिंग बाहेर प्रेक्षकांनी फुल्ल एंजाॅय केले. विक्याबरोबर नंतर-नंतर बिनसलं, पण तरीबी आम्ही दोघांच्या मैत्रीनं पहिले पाचसहा आठवडे अख्ख्या घराला भुंगा लावलावता. त्याच्याबरोबरचे ते दिवस अद्भूत होते.

हा जो व्हिडीओ हाय… तो ‘फायनॅलिस्ट’ म्हणून बिगबाॅसनं मला केलेला ‘सॅल्यूट’ होता… माझं कौतुक करताना बिगबाॅसनं जे शब्द वापरलेत ते कायमचे काळजात कोरून ठेवलेत. ‘अजिंक्य तारा… द किरण माने’ ! माझ्या मनावरच्या सगळ्या जखमा भरून काढणारं, ते माझं जगातलं सगळ्यात मौल्यवान अवाॅर्ड हाय हे… लब्यू बिगबाॅस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

 किरण माने यांनी ही पोस्ट शेअर करताना एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “किरण… किरण…. काय भारी खेळलात तुम्ही किरण दादा. आमच्यासाठी तुम्हीच बिग बाॅसचे विनर आहात.” तर दुसऱ्याने लिहिले की, “52 वर्षाचा तरुण वाघ बिग बाॅस तालमिचा वस्ताद.” त्यांची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधूव घेत आहे.

आधिक वाचा-
समर्पण लामा ठरला ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3’चा विजेता, ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रोख रक्कम
भयंकर! ‘या’ कन्नड अभिनेत्याने जोडप्याच्या अंगावर घातली भरधाव कार; महिलेचा मृत्यू

हे देखील वाचा