Friday, November 22, 2024
Home मराठी जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे भडकले किरण माने; म्हणाले, ‘किंमत वसूल…’

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे भडकले किरण माने; म्हणाले, ‘किंमत वसूल…’

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी झगडत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी आंदोलन केली. त्यामुळे काही ठिकाणी मोठी खळबळ उडाली आहे. जालना येथे 29 ऑगस्टला मराठा मोर्चा मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. या ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यानंतर लाठीचार्जची घटना घडली. या दरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर अनेक राजकीय मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या. तसेत सेलिब्रेटी देखील आपले मत व्यक्त करत आहेत. यावर मराठी सिनेसृष्टील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी देखील एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने (Kiran Mane) यांनी पोस्ट शेअर करताना लिहिले की, “माझ्या मराठा बांधवांनो… थेट बोलतो… आपल्याला धर्माच्या नांवावर भडकवणारेच आज आपल्या पाठीत खंजीर खुपसत हायेत. सावध होऊया. खरा शत्रू ओळखूया. आता तरी आपला खरा धर्म ओळखूया. धर्म संकटात आला की आपली मदत घेतली जाते आणि आपल्यावर हल्ला झाला की ‘एका जातीवर’ झाला असं समजलं जातं. आधी शेतकर्‍यांवर, मग वारकर्‍यांवर आनि आता या आंदोलनावर आघात झालाय. मराठा आरक्षण कुनाला नको हाय, ते शोधायला लै लांब नाय जावं लागनार. फक्त आपल्या धडावर आपलं डोकं असायला पायजे.

मनोज जरांगे पाटील…तुमच्याबद्दल काय बोलू? या भाकड काळात तुमी जे बोलताय ते बोलायला जिगरा लागतो ! परवा आमच्या आयाबहिनींचं रक्त पाहिल्यापास्नं आमचंबी काळीज तुमच्याइतकंच तुटतंय… रक्त सळसळायला लागलंय… हात शिवशिवताहेत. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. फक्त सावध रहा. शत्रू कुटिल कारस्थानी आहे. सहकार्‍यांवर लक्ष ठेवा. आंदोलनात छुपी घुसखोरी करून आंदोलन हायजॅक करण्याचा इतिहास ताजा आहे. आता सावधपणे, भान ठेवून शेवटचा घाव घालूया सगळे मिळून. आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन !’ अशा पोस्टवरनं जे कायम मला ट्रोल करतात त्यांना खरंतर मी एका केसाचीबी किंमत देत नाय. पन आज एक सांगतो, मी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पाईक हाय. कुनाच्या बापाला घाबरत नाय. काम काढून घेनन्याफिन्याला भेत नाय. मनगटाच्या बळावर मातीतनं पिकवून खानार्‍या शेतकर्‍याची औलाद हाय. कुनापुढं लाचार होनार नाय. समाजासाठी, गोरगरीबांसाठी आनि माझ्या शेतकर्‍यांसाठी वाट्टंल ती किंमत मोजून मी बोलनार. जीवात जीव असे पर्यंत बोलत राहणार. आंदोलनकर्त्या भावाबहिनींनो, तुमच्या रक्ताच्या सांडलेल्या एकेका थेंबाची किंमत वसूल झाली पायजे… न्याय मिळालाच पायजे. जय शिवराय. जय भीम.”

किरण माने सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि काही पोस्ट लिहून सोशल मीडियावर शेअर करत असतात. ते सतत त्यांच्या परखड मतामुळे चर्चेत येत असतात. किरण माने सतत समाजात घडत असलेले मुद्दे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. किरण माने यांच्या कामाविषयी बोलायचं झाले तर, ते आता “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” या मालिकेत काम करत आहेत. (Kiran Mane was enraged by the baton charge on Maratha protesters in Jalna)

अधिक वाचा- 
निळ्या पोल्को ड्रेस मधील क्रांती रेडकरचे हे फोटो पहाच
gautami patil father’s death | गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, उपचारादरम्यान वडिलांचे निधन

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा