Sunday, December 3, 2023

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे भडकला मराठी अभिनेता; म्हणाला, “राजकारणासाठी हे सारं…”

जालना जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलिसी बळाच्या वापरावर सध्या सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय. अनेक नेते पुढारी सदर ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा विनिमय करत आहेत. अशात जालना येथील सदर हिंसाचाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर इतर क्षेत्रातील लोकही त्यावर व्यक्त होऊ लागले आहे. दोन दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महागडे हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं या प्रकरणावरून तीव्र निषेध व्यक्त केला होता. ( marathi actor was angered by lathi charge on maratha protesters in jalna )

तिच्यानंतर आता प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यानेही आपले मत व्यक्त केले आहे. त्याने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यातून त्यानेही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.  अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ट्विटरवर पोस्ट केलीये, ज्यात तो म्हणाला की, ”जालन्यात शांततापूर्ण मार्गाने चालणाऱ्या आंदोलकांवर क्रूर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारी यंत्रणेचा तीव्र निषेध! दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला हवी! आपल्या महाराष्ट्रात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी. राजकारणासाठी हे सारं चिघळता कामा नये!”, असं तो यावेळी पोस्टमध्ये म्हणाला आहे.

अभिनेता हेमंत ढोमे हा अनेकदा सामाजिक-राजकीय घटनांवर व्यक्त होतो. जूलै महिन्यात अजित पवार गटाच्या बंडावरूनही त्यानं सोशल मीडियावर आपलं मतं मांडले होते. दिनांक 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासोबत 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. उपोषणकर्त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी प्रशासनानंही प्रयत्न सुरू केले होते. दोन वेळा झालेल्या चर्चेतूनही काही साध्य झालं नाही. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

अधिक वाचा –
– ‘लता मंगेशकर’ नावामुळेच शक्ती कपूरांच्या वडिलांनी त्यांना ‘या’ चुकीसाठी केले होते माफ, रंजक आहे किस्सा
– मराठमोळ्या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ
– फिरोज खानच्या गाडीला टक्कर मारून ‘विलन’ बनले शक्ती कपूर; काय आहे अभिनेत्याचं खरं नाव?

हे देखील वाचा