Tuesday, May 21, 2024

किरण माने लवकरच ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले…

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो‘ या मालिकेतील विलासरावची भूमिका साकारणारे प्रसिद्धी अभिनेते म्हणजे किरण माने होय. त्यांनी साकरलेल्या त्या भूमिकेला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ते ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे देखील चर्चेत आले होते. किरण माने सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते त्यांच्या आयुष्यातील अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

किरण माने (Kiran Mane) यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये किरण माने यांनी ते नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. त्यांची हि पोस्ट पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. त्यांची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” ही नवी चरित्रकथा ‘कलर्स मराठी’वर 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्ट करताना किरण माने यांनी लिहिले की, “…लवकरच मला बघाल एका जबरदस्त भुमिकेत ! तुम्हाला भारून टाकेल, हळवं करेल आणि प्रेरणाही देईल अशा अफलातून कलाकृतीत… शाळा सुटल्यावर लेकरं घराकडं ज्या ओढीनं धावत येतात…सासुरवाशीण ज्या आतुरतेनं माहेराकडं धाव घेते… ‘पंढरी’ हाकेच्या अंतरावर आल्यावर वारीतला वारकरी ज्या बेभानपणे धावा करतो…अगदी तसंच, तुम्ही दुसर्‍या कुठल्याबी चॅनलवर काहीही बघत असाल, तर ते चॅनल बदलून ‘कलर्स मराठी’ कडे धाव घेऊन ‘सिंधुताई…माझी माई !’ बघण्यासाठी आतूर व्हाल… एवढी अफाट ताकद असलेलं मनोवेधक कथानक घेऊन येतोय… 15 ऑगस्टपासून !”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारीत एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेते किरण माने एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, अद्यापही ते कोणत पात्र साकारणार आहेत हे समोर आलेल नाही. या मालिकेच नाव ‘सिंधुताई…माझी माई’ हे आहे. किरण माने यांनी केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. ही पोस्ट पाहून किरण माने आता कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे चाहत्यांच लक्ष वेधल आहे. (Kiran Mane will appear in the biopic of Sindhutai and Sapkal unfolding on the small screen)

अधिक वाचा- 
विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने शेअर केले बाेल्ड फाेटाे, एकदा पाहाच
लग्नाच्या 6 वर्षांनंतर गरोदर झालेल्या इशिता दत्ताने शेअर केला फोटो, एक्सप्रेशन्स देत दाखवला बेबी बंप

हे देखील वाचा