Thursday, February 22, 2024

आमिर खानची एक्स वाइफ म्हटल्याने नाराज झाली किरण राव; म्हणाली, ‘माझी स्वतःची ओळख आहे’

बॉलिवूड असो किंवा सोशल मिडीयाचे जग असो अनेकवेळा किरण रावला (Kiran Rao) अभिनेता अमिर खानची एक्स वाईफ म्हणून संबोधले जाते. सध्या किरण राव ‘लापता लेडिज’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच किरण रावने तिच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य केलं. विशेष म्हणजे किरण रावने एक्स वाईफ या तिच्या ओळखीवर नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या किरण रावला एका मुलाखती दरम्यान वैयक्तिक जीवनावर प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये एक्स वाईफ या त्यांच्या ओळखीसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाल्या किरण राव?

“सुरुवातीला जेव्हा मला कोणी अमिरची एक्स वाईफ म्हटले की, खुप विचित्र वाटायचं. जेव्हा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अमिर खानची पत्नी आहात का? असं विचारतात तेव्हा मी कोण आहे या लोकांना माहिती नाही का? मी काय काम करते? असे अनेक प्रश्न मला पडतात. कदाचित त्या लोकांना इतकच माहिती असेल की, मी अमिर खानची पत्नी आहे. पण मी केवळ अमिर खानची पत्नी नसून माझी एक स्वतःची वेगळी ओळख आहे.
मी आणि अमिर खान चांगले मित्र आहोत.”

ती पुढे म्हणाली की, “मला त्यांच्यासोबत काम करायला आवडते. काहीजण अजूनही मला अमिर खानची एक्स वाईफ म्हणून ओळखतात. खरं सांगायचं झालं तर मला या गोष्टीमुळे कोणताही फरक पडत नाही. जेव्हा मी अमिर खान सोबत लग्न केलं तेव्हा माझी स्वतःची एक स्पेस होती. माझा मित्रपरिवार आहे. मात्र, अमिर खानने कधीही माझ्या स्वतःच्या जीवनात ढवळाढवळ केली नाही.”

किरण राव आणि अमिर खान यांनी २००५ मध्ये लग्नगाठ बांधली होती. १६ वर्षाच्या संसारानंतर दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला. किरण राव आणि अमिर खान यांच्या घटस्फोटाला दोन वर्ष झाली आहेत. तरी देखील आजही अनेकजण किरण हिला आमिर खान याची पत्नी म्हणून ओळखतात.

किरण रावच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या आगामी चित्रपट ‘लापता लेडिज’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही कालावधीनंतर डायरेक्टरच्या भूमिकेत किरण राव पुन्हा मोठ्या पडद्यावर पदर्पण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

घटस्फोटानंतर मानसी नाईक ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, परदेशात साजरा करतीये व्हॅलेंटाईन वीक
यामीने ‘आर्टिकल 370’ साठी महिला NIA अधिकाऱ्याच्या कार्याचे केले कौतुक, पोस्ट करत म्हणाली…

हे देखील वाचा