सोशल मीडियावर अपडेट राहण्यासाठी आधी फक्त फोटो आणि व्हिडिओ कलाकार पोस्ट करायचे मात्र आता यांच्यासोबत ‘रिल्स’ हा एक नवीन, मजेशीर आणि हटके पर्याय उपलब्ध झाला आहे. रिल्स बनवण्यामध्ये कलाकार अतिशय अग्रेसर आहेत. या रिल्स तयार करण्यामध्ये बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार पुढे आहेत. रिल्समध्ये अग्रेसर असणाऱ्या कलाकारांमध्ये शिल्पा शेट्टीचे देखील नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल. बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी शिल्पा सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असून रिल्स बनवण्यामध्ये देखील ती पुढे आहे. घरी, बाहेर, सेटवर विविध ठिकणी संधी मिळाली की ती रिल्स बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सध्या शिल्पा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचे परीक्षण करत आहे. या शोच्या सेटवर देखील तिने आतापर्यंत अनेक रिल्स बनवले आहे. मात्र आता नवीन बनवलेले रिल हे तुफान गाजत आहे. या शोमध्ये शिल्पसोबतच किरण खेर आणि बादशहा परीक्षण करताना दिसणार आहे. या रिल व्हिडिओमध्ये किरण खेर बादशहाला उशिरा येण्यावरून जोरदार फाटकार लागवताना दिसत आहे. शिल्पा किरण यांच्याकडे बादशहा उशिरा येतो याची तक्रार करते आणि त्यावरून किरण बादशहाला ओरडताना दिसत आहे. त्या म्हणतात, “तू आला तर, मात्र हे सांग तुला एवढे वेळ कोणत्या गोष्टीत लागला. आम्ही सर्वांनी टचअप केले. केस नीट केले. पण तू…तुझे तर केसही आमच्यासारखे मोठे नाहीये. मग तुझ्या मेकअप वाल्याला नक्की का एवढा वेळ लागतो.” त्यानंतर किरणजी त्याला म्हणतात, “मला वाटते की तुझी तक्रार तुझ्या आईकडे करावी लागेल. आता चुपचाप बस इथे.” यानंतर बादशहा रडण्याची ऍक्टिंग करतो, आणि म्हणतो, “चूक झाली माफ करा.”
हा व्हिडिओ पोस्ट करताना शिल्पाने लिहिले की, “थोडक्यात बादशाह वाचला.” हा व्हिडिओ नेटकऱ्यांना तुफान आवडत असून, त्यावर त्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. नुकत्याच किरण खेर या कॅन्सरसारख्या मोठ्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत. कॅन्सरनंतर त्यांचा हा पहिलाच शो आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘जय गंगाजल’च्या ‘त्या’ सीननंतर ढसाढसा रडू लागली होती प्रियांका चोप्रा, मग अभिनेत्याने…
-पोलिस म्हणून सलमान खानला आवडते ‘ही’ खास व्यक्ती; अभिनेत्याने सांगितले काही किस्से