Tuesday, June 25, 2024

केएल राहुल अन् अथियाचा कल्बमधील ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, अभिनेत्री स्पष्टीतकरण देत म्हणाली, ‘स्वत: साठी उभे राहणे…’

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, आता अभिनेत्रीने पती केएल राहुलबद्दल एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने या बातमीचे खंडन केले आहे, ज्यात दावा करण्यात आला होता की, अभिनेत्री आणि तिचा पती केएल राहुल लंडनमधील स्ट्रिप क्लबमध्ये दिसले होते. एवढेच नाही, तर या दोघांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अभिनेत्री अथिया शेट्टी( athiya shetty) आणि केएल राहुल (kl rahul) सध्या लंडनमध्ये आहेत. अशात अथिया सतत लंडनमधील फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते. मंडळी, काहीदिवसांपुर्वीच केएल राहुलवर शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला होता. शस्त्रक्रियेनंतर खेळाडूने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तो सध्या बरा होत असल्याचे अपडेटही दिले.

यादरम्यान, शनिवारी (27 मे)ला केएल राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथियाने या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देत एक पाेस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने पाेस्ट शेअर करत लिहिले की, “मी सहसा गप्प राहणे पसंत करते आणि प्रतिक्रिया देत नाही, परंतु कधीकधी स्वत: साठी उभे राहणे आवश्यक असते. राहुल, मी आणि आमचे मित्र नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो, जसे की कुणी पण करतं. गोष्टी संदर्भाबाहेर काढणे थांबवा आणि प्रथम तुमचे तथ्य तपासा. शांतता आणि प्रेम.”

दरम्यान, आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केएल राहुल आणि अथिया क्लबमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये क्रिकेटरला गाण्यावर थिरकताना पाहून साेशल मीडिया युजर्स  केएल राहूलला जाेरदार ट्रोल करत आहेत.

https://twitter.com/ItsAlphaMale/status/1662522125989855237?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1662522125989855237%7Ctwgr%5E5ccd8df5a522e67733785aa5a5168faeb8e45aba%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fentertainment%2Fbollywood-kl-rahul-strip-club-video-went-viral-athiya-clarified-she-said-went-to-regular-place-23425355.html

मंडळी, यावर्षी 23 जानेवारीला केएल राहूल अन् अथिया शेट्टी लग्न बंधनात अडकले. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अशात खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर दोघांचा विवाह साेहळा संपन्न झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अथियच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘माेतीचूर चकनाचूर’, ‘नवाबजादे’, ‘मुबारकां’, ‘हीराे’ यासारख्या चित्रपटांमध्य कामे केले आहे.(kl rahul strip club video went viral actress athiya `shetty clarified she said wen to regular place )

हे देखील वाचा