Friday, April 19, 2024

इंजिनीअरिंग केल्यानंतर वळला होता मॉडेलिंगकडे, कष्ट करून मिळवली लोकप्रियता, वाचा संदीप नाहरचा संघर्षमय प्रवास

नुकतेच संदीप नाहर या बॉलिवूड अभिनेत्याने १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आत्महत्या केली आणि कलाकारांसोबतच फॅन्सला देखील मोठा धक्का दिला. कौटुंबिक वादातून आत्महत्या करत असल्याचे त्याने फेसबुकवर शेयर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. संदीपने अचानक उचलेल्या या टोकाच्या पावलांमुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. संदीप यांच्या आत्महत्येवर पोलीस चौकशी करतच आहेत. संदीप या क्षेत्रात कसा आला त्याने सुरुवात कशी केली याबद्दल आपण या लेखातून जाणून घेऊया.

संदीप नाहरला त्याच्या जवळचे लोक रजनीश सँडी म्हणून हाक मारत. संदीपने अगदी मोजक्याच सिनेमांमध्ये काम केले. मात्र, तरीही त्याने स्वतःची उत्तम ओळख निर्माण केली होती. चित्रपटांमध्ये काम करणे हे त्याचे स्वप्न नव्हते, निव्वळ योगायोगाने तो सिनेमामध्ये आला होता.

संदीपच्या कुटुंबाचा दूर दूर पर्यंत चित्रपटांशी कोणताही संबंध नव्हता. त्याचा एका मध्यमवर्गीय कुटुंबातच जन्म झाला. त्याचे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यांची इच्छा होती की, आपल्या मुलाने देखील सरकारी नोकरी करावी. संदीपने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि तो मॉडेलिंगकडे वळाला.

संदीपने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्याने २००७-०८ मध्ये चंदीगढमध्ये मॉडेलिंग सुरू केले आहे. त्याने एका पंजाबी अल्बममध्ये देखील काम केले. हा अल्बम हिट झाला आणि त्याला काहींनी मुंबईला जाऊन चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तो मुंबईला आला आणि नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्याने खूप संघर्ष केला. तो वन रूम किचनच्या घरात ६ मुलांसोबत राहायचा. अनेक संकटांचा सामना करून त्याने काम मिळवले, पण त्यातून त्याला यश मिळत नव्हते.

त्याने ‘कहने को हमसफर’, ‘हॅपी गो लकी’ अशा काही मालिकांमध्ये काम केले. यानंतर त्याला २०१६ साली ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमा मिळाला आणि लोकप्रियता देखील मिळाली. या सिनेमात त्याने ‘छोटू भैय्या’ सुशांत सिंग राजपूतच्या जिवलग मित्राची भूमिका निभावली होती. या सिनेमाने त्याला अपेक्षित लोकप्रियता मिळवून दिली. त्याला दाढी आणि मिशी खूपच आवडायची त्यामुळे तो नेहमी अशाच लूकमध्ये असायचा.

सन २०१९ साली त्याने अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ सिनेमात काम केले. यात त्याने बूट सिंग ही भूमिका साकारली. २०१९ मधेच त्याने ‘खानदानी शफाखाना’ मध्ये दीपु पलटा भूमिका केली.

सन २०२० मध्ये त्याने शुक्राणू या सिनेमात मंगल नावाची भूमिका केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणीसारख्या राहू’, जॅकी श्रॉफ यांच्या बायकोने त्यांच्या गर्लफ्रेंडला लिहिले होते पत्र, वाचा तो किस्सा
-ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल
-याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक

हे देखील वाचा