ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल


अभिनेत्री शोमा आनंद यांनी नुकताच त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा केला. अनेक सिनेमांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. शोमा यांनी हिंदीसोबतच अनेक पंजाबी सिनेमांतही काम केले. शिवाय त्यांनी त्यांच्या अभिनयाने टेलिव्हिजन क्षेत्र देखील जोरदार गाजवले. खलनायिका आणि विनोदी भूमिकांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. १६ फेब्रुवारी १९५८ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला होता. हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी ८० आणि ९० ही दोन दशकं खूप गाजवली.

शोमा यांनी १९७६ साली प्रमोद चक्रवर्ती यांच्या ‘बारूद’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात त्यांच्यासोबत ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. शोमा यांनी त्यांच्या पहिल्याच सिनेमात अनेक बोल्ड सीन्स दिले होते. मात्र, हा सिनेमा सपशेल आपटला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नव्हते. यातच त्यांनी असा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण करियर संपुष्टात आले.

शोमा यांचे सिनेमे जरी चालत नसले, तरी त्या खूप लोकप्रिय झाल्या होत्या. ८०/९० च्या दशकात त्या प्रत्येक सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका, सहाय्यक भूमिका निभवायच्याच. अशा वेळी त्यांनी सर्वाना धक्का देणारा निर्णय घेतला तो म्हणजे, लग्न करण्याचा. शोमा यांनी करियरच्या पीक पॉईंटला असताना निर्माता दिग्दर्शक तारिक शहा यांच्यासोबत १९८७ साली लग्न केले.

त्यांना लग्नानंतरही काम करायचे होते. मात्र, सासरच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी काम करणे थांबवले. जेव्हा त्यांनी काही वर्षांनी पुन्हा काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्या फक्त छोट्या, सहाय्यक, विनोदी भूमिकांपुरत्याच मर्यादित राहिल्या. जरी त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात सिनेमांपासून केली असली, तरी त्यांच्या करियरमध्ये त्यांनी खरे यश मात्र टेलिव्हिजनवर मिळवले.

शोमा यांच्या करियरमधला मैलाचा दगड ठरली ‘हम पांच’ ही मालिका. या मालिकेत त्यांनी बीना माथूर ही अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारली. एकता कपूरच्या या विनोदी मालिकेने लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड मोडले. शोमा यांना या मालिकेने प्रसिद्धीसोबत अनेक पुरस्कारही मिळवून दिले. या मालिकेनंतर त्यांनी अनेक मालिकांमध्ये नकारत्मक आणि विनोदी भूमिका साकारल्या.

शोमा यांनी त्यांच्या अभिनय प्रवासात आई, बहीण, काकू, आत्या आदी अनेक भूमिका निभावल्या. त्यांनी मोठ्या पडद्यावर ‘कूली’, ‘जैसी करनी वैसी भरनी’, ‘हिम्मतवाला’, ‘जुदाई’, ‘जागीर’, ‘आग और शोला’, ‘कल हो ना हो’, ‘हंगामा’, ‘क्या कुल हैं हम’ अशा अनेक सिनेमामध्ये दर्जेदार भूमिका केल्या. दुसरीकडे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘हम पांच’, ‘कुली’, ‘शरारत’, ‘मायका’, ‘भाभी’, ‘जीनी और जीजू’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले.

शोमा आणि तारिक यांना सारा नावाची एक मुलगी असून, शोमा मागील काही काळापासून अभिनयापासून लांब आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक
-पारा चढला..!! दिशा पटानीने पुन्हा केले चाहत्यांना क्लिन ‘बोल्ड’, बिकिनीतील फोटोंचा सोशलवर धुमाकूळ
-धोनी सिनेमात सुशांत सिंग सोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, फेसबुकवर शेअर केली सुसाइड नोट


Leave A Reply

Your email address will not be published.