सध्या महाराष्ट्रात दोन मुद्दे कमालीचे गाजत आहे. ते म्हणजे संभाजी भिडे यांनी गांधीजींबद्दल केलेले व्यक्तव्य आणि दूर मुद्दा म्हणजे शरद पोंक्षे यांनी त्यांची लेक पायलट झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना केलेली पोस्ट. या दोन्ही पोस्टवर मनोरंजनविश्वात, राजकीय विश्वातून किंबहुना सर्वच क्षेत्रातील दिग्गजांच्या यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यात सामान्य लोकं देखील त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून देताना दिसत आहे.
अशातच आता पुन्हा एकदा शरद पोंक्षे हे चर्चेत आले, मात्र एका वेगळ्याच विषयांमुळे. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर भाष्य केले आहे. या मुलखतीचे अनेक प्रोमो सध्या सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये शरद पोंक्षे म्हणताना दिसतात, “मी जेव्हा स्टेजवर गांधीजींना गोळी मारायचो आणि टाळ्या पडायच्या…त्याबद्दल मी माझ्या पुस्तकात खंत व्यक्त केली. नक्कीच वेगवेगळी मतं असू शकतात. विचारसरणी वेगळी असू शकते. पण, ही माणसे मोठी आहेत. मी सावरकरवादी आहे. मात्र, इतर लोक ज्यापद्धतीने असंस्कृत शब्द वापरुन हेटाळणी करतात, तसे मी कधीच बोलू शकणार नाही.”
View this post on Instagram
पुढे शरद पोंक्षे म्हणतात, “गांधीजींचे मोठेपण मी कधीच अमान्य करू शकत नाही. मात्र, त्यांची अतिशय पराकोटीची असलेली अहिंसा जरा खूपच होती आणि मुस्लीम लांघुलचा… परिपाक इतका झाला की आज त्याचे भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. मी गांधीजींना विरोध करताना ही सुसंस्कृत भाषा कधी सोडणार नाही, ही पातळी सोडू शकत नाही. ते त्या माणसाचे मोठेपण आहे.”
दरम्यान शरद पोंक्षे यांची लेक नुकतीच पायलट झाली. त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली जी कमालीची व्हायरल झाली असून, ज्यावर मनोरंजनविश्वातून अतिशय वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे.