कलाकार हे नेहमीच फॅन्समध्ये लोकप्रिय असतात. सध्या सोशल मीडिया आल्यामुळे कलाकारांसोबत त्यांचे कुटुंब देखील प्रकाशझोतात आले आहे. कलाकार आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच एक वेगळे आकर्षण असते. प्रेक्षक नेहमीच याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. यात स्टार्स किड्स खूपच जास्त चर्चेचा विषय असतो. तसे पाहिले तर बऱ्याच कलाकारांच्या मुलांबद्दल आपल्याला जास्त माहितीच नाहीये. जे सोशल मीडियावर सक्रिय आहेत किंवा जे मीडियाच्या कॅमेरांमध्ये कैद होतात, त्यांच्या बद्दलच आपल्याला माहिती असते. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं काय करतात हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांच्या मुलांबद्दल सांगणार आहोत. (know-about-bollywood-celebrities-kids)
फरहान अख्तर
प्रतिभासंपन्न अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या फरहानचा आता जरी घटस्फोट झाला असला, तरी त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून अधुनापासून दोन मुली आहेत. शाक्या आणि अकिरा या त्याच्या मुली कधीही फारशा चर्च्यांमध्ये नसतात.
आमिर खान
आमिर खानला त्याची पहिली बायको रीना दत्तापासून इरा खान, जुनैद खान ही दोन मुलं आहेत. तर त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून त्याला आझाद राव खान हा मुलगा आहे. इरा खान ही मागील काही काळापासून सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. तर जुनैद खान हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या बऱ्याचदा येतात. तर आमिरचा दुसरा मुलगा आझाद हा किरण राव आणि आमिर खान यांचा मुलगा असून, तो सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल यांना एक मुलगा आरव आणि एक मुलगी नितारा आहे. अक्षयला नेहमी त्याच्या मुलांसोबत बघितले जाते. आरव १९ वर्षांचा असून, तो मार्शल आर्ट्समध्ये निपुण आहे. त्याला राष्ट्रीय ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. तर नितारा ९ वर्षांची आहे.
संजय दत्त
संजय दत्त आणि त्याचे जीवन हे तर सर्वश्रुत आहे. संजय दत्तला त्याची पहिली पत्नी रिचा शर्मापासून एक मुलगी असून, तिचे नाव त्रिशाला दत्त आहे. त्रिशाला अमेरिकेत तिच्या मावशीकडे राहते. त्रिशाला मानसोपचार तज्ज्ञ असून, संजय नेहमी तिला भेटायला अमेरिकेत जात असतो. तर त्याला त्याच्या दुसऱ्या बायको मान्यतापासून शहरान आणि इकरा ही दोन जुळी मुलं आहे.
शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला आर्यन, सुहाना, अबराम ही तीन मुलं आहेत. आर्यन हा २३ वर्षाचा आहे. जरी त्याने अभिनयात पदार्पण केले नसले, तरीही ‘कभी ख़ुशी कभी गम’ मध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. शिवाय ‘द लायन किंग’ सिनेमाला त्याचा आवाजही दिला आहे. तर सुहाना खान ही २१ वर्षाची आहे, तिनेही सिनेमात पदार्पण केले नाहीये, मात्र ती सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय आहे. अबराम खान हा सरोगसीचा माध्यमातून झाला असून तो ८ वर्षाचा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ सुपरहिट गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये झळकणार सोनू सूद; पुन्हा मिळाली फराह खानची साथ