‘या’ सुपरहिट गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनमध्ये झळकणार सोनू सूद; पुन्हा मिळाली फराह खानची साथ


कोरोना काळात देवदूत बनून सर्वांच्या मदतीला धावून आलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे सोनू सूद होय. त्याने अनेकांना कोरोना काळात मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यावर्गात खूप भर पडली आहे. अशातच त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोनू सूद लवकरच एका म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.

सोनू सूद त्याच्या आगामी म्युझिक व्हिडिओमध्ये चांगलाच जलवा दाखवताना दिसणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ९० च्या दशकातील सुपरहिट गाणे ‘तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचा नवीन वर्जनमध्ये तो दिसणार आहे. हे गाणे गायक अल्ताफ राजा यांनी गायले होते. आता हे गाणे टोनी कक्कर आणि अल्ताफ राज हे एकत्र गाणार आहेत. तसेच फराह खान सोनू सूदसोबत मिळून रिमिक्स शूट करणार आहे. (Sonu Sood will appear in the remix of the popolar song Tum to thahare pardesi)

माध्यमातील वृत्तानुसार, सोनू सूदने एका मुलाखतीत त्याच्या म्युझिक व्हिडिओबाबत सांगितले होते. त्याने सांगितले होते की, या व्हिडिओमध्ये तो एका शेतकऱ्याची भूमिका निभावताना दिसणार आहे. या व्हिडिओमधून एक सुंदर लव्हस्टोरी दाखवली जाणार आहे. या व्हिडिओचे दिग्दर्शन फराह खान करणार आहे. फराह खानसोबत ट्यूनिंग बाबत सोनू सूद म्हणाला की, “त्यांनी ‘हॅप्पी न्यू इयर’ मध्ये देखील दिग्दर्शन केले आहे. मला तेव्हाच्या गोष्टी अजूनही लक्षात आहेत. आता पंजाबमध्ये शूटिंग चालू आहे आणि सेटवर पहिल्या सारखेच वातावरण पाहायला मिळत आहे.”

सोनू सूदने या आधी शेवटचे रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्याने खलनायकाची भूमिका निभावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?

-सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.