Friday, March 29, 2024

महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे चिंतीत अमेय खोपकरांनी मारला बॉलिवूडला टोला; म्हणाले, ‘माझ्या राज्यात राहून…’

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यात चिपळूणसारख्या ठिकाणी तर नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अनेकजण त्यांचं मत व्यक्त करत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि मराठी चित्रपटाच्या निर्माते अमेय खोपकर यांनी याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. जी सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

अमेय खोपकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून महाराष्ट्रात आलेल्या पूराबाबत एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरू केले आहे. आमचे महाराष्ट्र सैनिक देखील झटत आहेत. अशा वेळी माझ्याच राज्यात राहून बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोड संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावला असं जाहीर आवाहन करतो.”

https://www.facebook.com/662630549/posts/10161101467205550/?d=n

त्यांनी केलेली ही पोस्ट वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरत आहे. त्यांच्या या वक्तव्याला अनेकांनी त्यांची सहमती दर्शवली आहे. या पोस्टवर सातत्याने प्रतिक्रिया उमटत आहेत. (Marathi producer ameya khopkar post about Maharashtra’s flood)

अमेय खोपकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते देखील आहेत. ते मराठीमधील ‘लय भारी’ आणि ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटांचे निर्माते आहेत. त्यांचे हे दोन्ही चित्रपटात सुपरहिट झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

खरंच की काय! रिया चक्रवर्तीला बॉलिवूड नाही, तर हॉलिवूडमधून मिळणार चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी?

-सुहानाने स्विमिंग पूल जवळील हॉट फोटो केले शेअर; आई गौरीने केले क्लीक, तर शाहरुख म्हणतोय, ‘हा दिखावा आहे…’

मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

हे देखील वाचा