आपण नेहमीच कलाकारांच्या मानधनाच्या बातम्या ऐकत असतो. अमुक अमुक कलाकाराने इतके कोटी मानधन घेतले, त्याची इतकी प्रॉपर्टी आहे याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या बातम्या, माहिती समोर येतच असते. जितका मोठा कलाकार तितके त्याचे मानधन जास्त. कलाकार चित्रपटांबरोबरच विविध जाहिरातींमध्ये देखील आपल्याला दिसतात. या जाहिराती करण्यासाठी कलाकरांना बक्कळ पैसा मिळतो. जाहिरातींमुळे मिळणाऱ्या पैशांवरून देखील ते नेहमी प्रकाशझोतात राहतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊया बॉलिवूडमधील कलाकार जाहिरातींसाठी किती पैसे घेतात.
अमिताभ बच्चन :
महानायक अमिताभ बच्चन देखील मोठयामोठ्या जाहिरातींमध्ये आपल्याला नेहमी दिसतात. ते कॅडबरी, नवरत्न तेल, डॉ. फिक्सिट, गुजरात टूरिज्म यासोबत अनेक जाहिराती करतात. प्रत्येक जाहिरातींचे ते ३/८ कोटी रुपये घेतात.
सलमान खान :
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चित्रपट नी टेलिव्हिजनवरील शोमधिं कोट्यवधी रुपयांची कामे करतो. जाहिरातींच्या बाबतीतही तो अजिबात मागे नाही. सलमान एका जाहिरातीसाठी जवळपास ४/१० कोटी रुपये चार्ज करतो.
आमिर खान :
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान एका जाहिरातीसाठी २/७ कोटी रुपये घेतो. सध्या आमिर आपल्याला वेदांतू, विवो फोन, कोकाकोला यांसारख्या जाहिरातींमधून दिसत आहे.

ऐश्वर्या राय :
माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय चित्रपटांमधून तिच्या सौंदर्याची भुरळ नेहमीच सर्वांवर घालत असते. बऱ्याच जाहिरातींमधून सुद्धा ऐश्वर्या आपल्याला दिसते. बहुतकरून सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीत ती जास्त दिसते. एका जाहिरातीसाठी ऐश्वर्या २/७ कोटी रुपये घेते.
शाहरुख खान :
बॉलिवूडचा किंग खान चित्रपटांसाठी घेणाऱ्या मानधनाबाबतीत नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटांसाठी जास्त फि घेणाऱ्या कलाकारांपैकी एक असणारा शाहरुख एका जाहिरातीसाठी ४/१० कोटी रुपये घेतो.
करीना कपूर खान :
करीना कपूर खान सुद्धा अनेक जाहिरातींमधून आपल्याला दिसते. ती एका जाहिरातीसाठी ३/४ कोटी रुपये घेते.
अक्षय कुमार :
कमाईच्या बाबतीत अक्षय सर्वात पुढे आहे. आज अक्षयकडे अनेक मोठमोठे ब्रँड्स जाहिरातीसाठी येतात. तो एका जाहिरातीसाठी तब्बल ५/१० कोटी रुपये घेतो.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन
-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी
-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे










