Saturday, September 30, 2023

चित्रपटसृष्टीतील सिंगल ‘बापमाणसं’, जे त्यांच्या मुलांना एकटेच देतायत आई- वडिलांचे प्रेम

प्रेम, समर्पण, त्याग आदी अनेक गोष्टींसाठी वडील ओळखले जातात. मुलांसाठी वडील नेहमी योग्य दिशादर्शक असतात. आपल्या मनात त्यांच्याबद्दल असणारा भीतीयुक्त आदर आणि त्यांच्या रागातही असणारे त्यांचे प्रेम नक्कीच जगावेगळे आणि अवर्णनीय आहे. आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जगाशी लढणारे आपले वडील नक्कीच सर्वांसाठी खास असतात.

सामान्यतः तसे पाहिले, तर मुलं नेहमीच त्यांच्या आईच्या जास्त जवळ असतात. वडील कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर असल्याने आईच मुलांना योग्य संस्कार देते. या जगात उभं राहण्यासाठी बळ देते, जगाशी लढण्यासाठी प्रेरणा देते. मात्र, अशी अनेक उदाहरण आहेत जिथे आईची सर्व कर्तव्ये वडील पूर्ण करत आहेत. कारण काहीही असले तरी आईच्या सर्व जबाबदाऱ्या वडील अगदी योग्य पद्धतीने निभावतात. सोबत वडिलांची देखील कर्तव्ये पार पडत असल्याची अनेक उदाहरण चित्रपटसृष्टीतही खूप आहेत.

करण जोहर
सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहरचे नाव सर्वात आधी येते. करण त्याच्या रुही आणि यश या दोन मुलांना एकटा सांभाळत आहे. सरोगसीच्या माध्यमातून जन्म झालेल्या या मुलांची सर्व जबाबदारी करण योग्य पद्धतीने पार पाडत आहे.

तुषार कपूर
तुषार कपूर देखील एक सिंगल फादर आहे. तुषारच्या मुलाचे नाव लक्ष्य असून त्याचा जन्म देखील सरोगसीने झाला आहे. तुषार नेहमी त्याच्या मुलाचे फोटो शेअर करत असतो.

चंद्रचूड सिंग
‘आर्या’ वेबसीरिजमधून धमाकेदार कमबॅक करणारा चंद्रचूड सिंग देखील त्याच्या मुलाला एकटाच सांभाळतो. तो त्याचा जास्त वेळ मुलासोबतच घालवताना दिसतो.

राहुल देव
हिंदी आणि दाक्षिणात्य अभिनेता राहुल देव देखील त्याच्या मुलाला सिद्धार्थला एकटा सांभाळतो. २०१० साली राहुलच्या बायकोचे कॅन्सरने निधन झाले होते. सध्या राहुलचा मुलगा यूकेमध्ये शिकत आहे.

राहुल बोस
प्रतिभावान अभिनेता राहुल बोस चक्क सहा मुलांचा सिंगल फादर आहे. लग्नाआधी त्याने अंदमान निकोबारच्या ६ मुलांना दत्तक घेतले असून तो त्यांची संपूर्ण जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
‘पूजा हेगडेने आत्म’हत्या करण्याचा प्रयत्न केला’, म्हणणाऱ्या युजरवर अभिनेत्रीचा संताप, पाठवली कायदेशीर नोटिस
रेखाला ‘हडळीण’ म्हणत नर्गिसने केलं होतं धक्कादायक विधान; म्हणालेली, ‘ती मर्दांना असे इशारे करायची जसे…’

हे देखील वाचा