Monday, October 2, 2023

‘पूजा हेगडेने आत्म’हत्या करण्याचा प्रयत्न केला’, म्हणणाऱ्या युजरवर अभिनेत्रीचा संताप, पाठवली कायदेशीर नोटिस

सोशल मीडिया आल्यापासून कलाकार हे त्यांच्या चाहत्यांच्या खूपच जवळ पोहोचले आहेत. सोशल मीडियाद्वारे चाहते कलाकारांशी संवाद साधतात. तसेच, कलाकारही चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्याविषयी माहिती देत असतात. मात्र, सोशल मीडियाने कलाकारांना चाहत्यांसोबतच ट्रोलर्सही दिले आहेत. काही ट्रोलर्स हद्दच पार करतात. आताही असेच काहीसे घडले आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे हिच्यासोबत एका सोशल मीडिया युजरने वाईट चेष्टा केली आहे. अनेकदा कलाकार ट्रोलर्सकडे दुर्लक्षित करतात, पण यावेळी पूजाने मोठे पाऊल उचलले आहे.

ट्वीट व्हायरल
खरं तर, उमेर संधू (Umair Sandu) नावाच्या एका ट्विटर युजरने 15 जुलै रोजी पूजा हेगडे (Pooja Hegde) हिच्याविषयी धक्कादायक ट्वीट केले होते. या युजरने पूजाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबाबत ट्वीट केले होते. या युजरने लिहिले होते की, “ब्रेकिंग न्यूज: पूजा हेगडेने आज दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. देवाच्या कृपेने तिच्या कुटुंबीयांना तिला वाचवले. तपशील येत आहेत. तिच्या भावानुसार, ती मागील 2 आठवड्यांपासून गंभीर अवस्थेत होती.”

यानंतर पूजाने या व्यक्तीला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. ही माहिती स्वत: संधूने ट्विटरद्वारे दिली आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “पाठव पाठव नोटिसा, फ्लॉप अभिनेत्री.” विशेष म्हणजे, या ट्विटर हँडलवर संधूने स्वत:ला ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचा सदस्य म्हटले आहे. या युजरचा पत्ता लंडनचा आहे.

अभिनेत्रीची कारकीर्द
मागील एक वर्ष पूजा हेगडे हिच्यासाठी खास राहिले नाहीये. तिचे अनेक सिनेमे फ्लॉप झाले आहेत. तिचा प्रभास याच्यासोबतचा ‘राधे श्याम’ हा पॅन-इंडिया सिनेमा वाईटरीत्या फ्लॉप झाला होता. तसेच, मागील वर्षी आलेला ‘सर्कस’ हा सिनेमाही खास कमाल करू शकला नव्हता. तसेच, यावर्षी सलमान खान अभिनित ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमातही ती दिसली होती. मात्र, सिनेमा कमाल करू शकला नाही. पूजाने ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याच्यासोबत ‘मोहेंजोदडो’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. मात्र, तिचे हिंदी सिनेमे कमाल दाखवू शकले नाहीत. ती आगामी सिनेमात शाहिद कपूर याच्यासोबत दिसणार आहे. (actress pooja hegde gossip about her try to commit suicide issues legal notice read more)

महत्त्वाच्या बातम्या-
रेखाला ‘हडळीण’ म्हणत नर्गिसने केलं होतं धक्कादायक विधान; म्हणालेली, ‘ती मर्दांना असे इशारे करायची जसे…’
पलक तिवारीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! आईबाबत खुलासा करत म्हणाली, ‘मी कुणाला डेट करू नये म्हणून ती माझे…’

हे देखील वाचा