अरेरे! शाहरुखच्या ‘या’ सवयीवर गौरी खानही वैतागली; म्हणाली, ‘तो सारखाच मन्नतच्या बाहेर…’

0
82
Shahrukh Khan & Gauri Khan
Photo Courtesy: Instagram/gaurikhan

 ‘कॉफी विथ करण 7’ च्या आगामी एपिसोडमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध महिला पाहुणे म्हणून सामील होणार आहे. मेकर्सनी त्याचा प्रोमो एका दिवसापूर्वी रिलीज केला आहे. आगामी एपिसोड्समध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान (Gauri Khan), संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि चंडी पांडेची पत्नी भावना पांडे यांचा समावेश असेल असे दिसून आले आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये गौरीने शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) एका सवयीचा खुलासा केला आहे. खुद्द गौरीही शाहरुखच्या या सवयीमुळे खूप नाराज आहे.

गौरी खानने सांगितले की, “जेव्हाही घरात पार्टी असते तेव्हा शाहरुख खान पाहुण्यांची गाडी येईपर्यंत वाट पाहतो. गौरी म्हणाल्या की, पार्टी आतमध्ये नव्हे तर ‘मन्नत’च्या बाहेर होत असल्याचे तिला जाणवते. गौरी म्हणते, “ते पाहुणे त्याच्या गाडीत बसेपर्यंत तो नेहमी पाहत असतो. कधीकधी मला असे वाटते की तो पार्ट्यांमध्ये आतपेक्षा दारातच जास्त वेळ घालवतो.”

गौरी खान पुढे म्हणते, “मग लोक त्याला शोधू लागतात. मला असे वाटते की आपण पार्टी घरात नाही तर घराबाहेर करत आहोत. याशिवाय, आधीच्या प्रोमोमध्ये करण जोहर गौरीला विचारतो की तिला मुलगी सुहानाला काय सल्ला द्यायचा आहे. त्यावेळी तिने एकावेळी दोनपेक्षा जास्त  डेट करू नकोस असा सल्ला दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

यानंतर तो महीप कपूरला विचारतो की तिला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल?महीप कपूर यावर हृतिक रोशनचे नाव घेते. ती म्हणते, “तो छान दिसतो आणि मलाही त्याच्यासोबत राहायला आवडेल.” करण हसतो आणि आश्चर्य व्यक्त करतो. दरम्यान कार्यक्रमाचा हा प्रोमो सोशल मीडीयावर चांगलाच चर्चेत आला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- ‘तुझे स्तन खूपच…’ बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
मुकेश खन्ना यांनी पुन्हा साधला बॉलिवूड कलाकारांवर निशाणा; म्हणाले, ‘चुकीचे वक्तव्य करण्याआधी एकदा विचार करा’
‘हे’ असणार अमिताभ बच्चन यांचे नवीन निवासस्थान? बिग बींनी ३१ व्या मजल्यावर खरेदी केले अलिशान अपार्टमेंट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here