अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी मध्यतरी गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी यांच्यातील जवळीकीबद्दल अनेक दावे केले होते. तसेच ते दोघे लग्न करणार आहेत. असे हि म्हणले गेले होते. तर आता याबाबतची माहिती समोर आली आहे. जेव्हा राखी सावंतने सुनीताशी थेट फोनवर संवाद केला. हा काॅल स्पीकरवर होता आणि हा फोन पापाराझींनी रेकॉर्ड केला.
या संभाषणा दरम्यान जेव्हा सुनीताला तिच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ती मोकळेपणाने बोलली सुनीताच्या म्हणण्यानुसार गोविंदा आणि कोमल राणी एकमेकांशी लग्न करण्याची योजना आखत होते. सुनीता म्हणाली ते लग्न करण्याची योजना आखत होते म्हणुन मी खटला मागे घेतला हे ऐकुन राखी म्हणाली की तिने योग्य निर्णय घेतली हे लक्षात घेउन तिने पुढील वाद टाळण्यासाठी न्यायलयातुन आपली याचिका मागे घेतली. तसेच सुनीताने फोनवर तीची व्यथा माडत म्हणाली की ते दोघे विमातळावर एकत्र दिसले तेव्हा मला धक्काच बसला.
या संपुर्ण घटनेदरम्यान राखी सावंत सुनीताच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तिने तिला प्रोत्साहन दिले आणि धैर्यवान राहण्याचा सल्ला दिला राखीने सुनीताला तिच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक हक्कांबाबत सतर्क राहण्याचा आग्रह केला तिने सुचवले की, सुनीताने गोविंदाच्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरीव आपले हक्क आणि कायदेशीर मालकी सुरक्षित करावा जेणेकरुन तिला भविष्यात कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
अभिनेता गोविंदाने (govinda)एका व्हिडिओव्दारे आपल्या पत्नीच्या वारंवार होणाऱ्या सार्वजनिक आरोपांना उत्तर दिले. त्याने सुनीताला शांत राहण्याचे आणि योग्य भाषा वापरण्याचे आवाहन केले.
हेही वाचा
अभिनेता वरुण धवनने खरेदी केली स्वतःची शेतजमीन, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल










