Tuesday, May 28, 2024

बाबो! अनन्या पांडेला आवडतो ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता म्हणाली, ‘तु खुप सेक्सी आहेस, पण’

बॉलिवूड निर्माता करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण कार्यक्रम चांगलाच चर्चेत असतो. कार्यक्रमात सिने जगतातील अनेक कलाकारांना आमंत्रित केले जाते. त्याचबरोबर कॉफी विथ करण मध्ये आलेले कलाकार अनेक नवनवीन किस्से सांगत असतात तसेच खुलासा करताना दिसत असतात. लवकरच कॉफी विथ करणमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे ( Ananya Pandey) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) सहभागी होणार आहे. यावेळी कार्यक्रमात अनन्या विजय देवरकोंडासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. या भागाचा धमाकेदार प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या सुपरहिट टॉक शोच्या नवीन भागांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना अधिक मनोरंजन करण्यासाठी शोचे निर्माते त्यांच्या आगामी भागांचे मजेदार प्रोमो देखील बनवतात. लवकरच प्रसारित होणार्‍या एपिसोडमध्ये साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे एकत्र दिसणार आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सोशल मीडियावपर या भागाशी संबंधित एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये, विजय देवरकोंडा अनन्या पांडेला तेलुगुमध्ये काही ओळी सांगतांना दिसत आहे, ज्याचा अर्थ आहे, “तू खूप गोड मुलगी आहेस पण माझ्याशी असे फ्लर्ट करणे थांबव.” त्याचवेळी विजयच्या बोलण्याला उत्तर देताना अनन्या म्हणते की, “हे खूप सेक्सी आहे, पुन्हा सांग.” तेवढ्यात ‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहर मध्येच येत त्यांना थांबवतो आणि म्हणतो की मुळात देवराकोंडा तुला त्याच्यावर लाईन मारण्याचे थांबवायला सांगत आहेत असे म्हणताना दिसत आहेत.

दरम्यान, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे त्यांच्या आगामी एक्शन थ्रिलर ‘लायगर’ च्या रिलीजची वाट पाहत आहेत, जो करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत असून अनन्या आणि विजय देवरकोंडा जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा –

जेव्हा अभिनेत्री बिपाशा बसुच्या प्रेमात आकंठ बुडाला होता आर.माधवन, स्वतःच दिली होती प्रेमाची कबुली

न्यूड फोटोशूट करताना काय होती रणवीर सिंगची अवस्था?, फोटोग्राफरने सांगितल्या कॅमेरामागील गोष्टी

अश्लीलता पसरवल्याप्रकरणी शिल्पा शेट्टी पोहोचली कोर्टात, ‘या’ व्यक्तीने केले होते सार्वजनिक ठिकाणी किस

हे देखील वाचा