बॉलिवूडचा ‘बाबा’ म्हणून प्रसिद्ध असणारा संजय दत्त हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातोच. सोबतच त्याच्या आयुष्यातील अशा गोष्टींसाठी ओळखला जातो, ज्या गोष्टींमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागले. ज्या गोष्टींमुळे त्याने त्याची संपूर्ण प्रसिद्धी आणि लोकप्रियता गमावली होती आणि त्याच्यावर अतिरेकी असल्याचा आरोप देखील झाला होता. शिवाय तो त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे देखील तितकाच ओळखला जातो. त्याचे जीवन हे चित्रपटाच्या कथेला अगदी साजेसे असल्याने त्यावर ‘संजू‘ नावाचा सिनेमा देखील बनवला गेला होता.
या सर्वांमध्ये संजय आणि त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांचे नाते आणि त्या नात्यासंबंधित अनेक किस्से मीडियामध्ये अनेक गाजताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये तो त्याच्या मुलीबद्दल बोलताना दिसत आहे. संजय दत्तने १९८७ मध्ये अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या रिचा शर्मासोबत लग्न केले. त्यांना त्रिशाला नावाची एक मुलगी देखील आहे. त्रिशाला ही अमेरिकेत असते. सोशल मीडियावर तर या बाप-लेकीच्या जोडीचे बरेच फोटोही व्हायरल होताना दिसतात.
या व्हायरल व्हिडिओमध्ये संजय सांगतो की, त्रिशाला त्याला तिच्या बालपणी चक्क काका म्हणून हाक मारायची. आपली मुलगीच आपल्याला काका म्हणून हाक मारते, हे ऐकून तेव्हा संजयला धक्का बसला आणि संजयचा राग खूपच अनावर झाला. या कारणामुळे रिचा आणि संजयमध्ये वादाला सुरुवात झाली. रिचावर संजय खूप चिडला, त्रिशालाला रिचा चुकीची शिकवण देते असा आरोप संजयने तिच्यावर केला. वडिलांनाच काका म्हणून हाक मारायची हे रिचाच आपल्या मुलीली शिकवते, असे ठाम मत संजयचे होते. यावरुन संजय-रिचामध्ये अनेक मतभेद झाले.
सोबतच त्याने या व्हिडिओमध्ये सांगितले की, “जेव्हा रिचा हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा तिच्या आई-वडिलांनी मला जे काही विचारले ते ऐकून मला धक्काच बसला. तिच्या आई-वडिलांनी मला विचारले, ‘आता त्रिशालाचे काय?’ मी विचारले, ‘तिच्याबद्दल काय?’ तेव्हा ते म्हणाले होते की, त्रिशालाला त्यांना त्यांच्याकडे ठेवायचे होते. मी त्यांना म्हटले तुम्ही असे कसे करू शकता? अजून रिचा आहे. त्यांनी मला हे देखील विचारले की, मी मुलीच्या कस्टडीसाठी कायद्याची लढाई लढू शकतो का? तेव्हा मी म्हटले अजून किती लढाई लढू मी. तुम्हाला जे योग्य वाटेल, ते करा फक्त मला माझ्या मुलीला भेटता आले पाहिजे.” रिचाचे आईवडील न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्रिशालाचा जन्म देखील तिथलाच. त्रिशालाला तिच्या आजी-आजोबांनी लहानाचे मोठे केले आहे. संजय नेहमी त्याच्या मुलीला भेटायला न्यूयॉर्कला जात असतो.
माध्यमातील वृत्तानुसार, संजय आणि रिचामध्ये माधुरीमुळे कटुता आली. माधुरीच्या मागे संजय ठार वेडा झाला होता. रिचा अमेरिकेत कॅन्सरसोबत लढत होती. मात्र, तो तिला हॉस्पिटलमध्ये एकटीला सोडून भारतात आला होता. जेव्हा रिचाला संजय माधुरीबद्दल समजले, तेव्हा ती भारतात परतली. मात्र, संजय तिला घेण्यासाठी एअरपोर्टवर देखील गेला नव्हता.
माधुरी आणि संजयमध्ये सर्व गोष्टी तेव्हा बिघडल्या, जेव्हा मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात आणि ड्रग्ज प्रकरणात संजयचे नाव घेण्यात आले. त्यानंतर माधुरीने त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले होते. माधुरी दीक्षितने ती कधी संजय दत्तसोबत रिलेशनमध्ये होती, हे देखील मान्य करायला नकार दिला होता.
अधिक वाचा-
–कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव
–निक्की तांबोळीचा ‘तो’ फोटो पाहून उडाली चाहत्यांची झोप, वाढला इंटरनेटचा पारा