प्रेम म्हटलं की, त्यात वादविवाद, दया, क्षमा या सर्व गोष्टी येतातच. हे सर्व कलाकारांनाही अपवाद नाहीत. नुकतेच प्रसिद्ध कोरियन अभिनेता किम सियोन होने आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीची म्हणजेच एक्स गर्लफ्रेंडची माफी मागितली होती. यानंतर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे मनपरिवर्तन झाले असून तिने किमला माफ केले आहे. मुख्य म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडने किमवर आरोप केला होता की, त्याने तिच्याशी लग्न करण्याचे खोटे वचन देऊन तिला गर्भपात करण्यासाठी प्रवृत्त केले होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, किमच्या एक्स गर्लफ्रेंडने कोरियाबूमध्ये एक पोस्ट लिहून त्याला माफ केले आहे. तिने लिहिले की, “मला खेद वाटतो की, लिखाणाने अनवधानाने अनेक लोकांना दुखावले आहे. एक काळ होता जेव्हा किम आणि मी एकमेकांवर खरोखर प्रेम करायचो. माझ्या पोस्टमुळे ते तुटले आहे, जे मला चांगले वाटत नाहीये.” (Korean Actor Seon Kim Seon Ho Ex Girlfriend Reacts They Love Each Other)
UPDATE TO KIM SEON HO issue
his ex girlfriend has a new post and says that she received apology and that there was just a misunderstanding .. Omoooooooo ????????????????????#ProtectKimSeonHo #Kimseonho pic.twitter.com/InE8tTulMy
— Delilah (@iWonder30257963) October 20, 2021
किमच्या एक्स गर्लफ्रेंडने पुढे लिहिले की, “त्याने माझी माफी मागितली आहे. आमच्यामध्ये काही गैरसमज होते. मला आशा आहे की, यापुढे कोणत्याही खोट्या गोष्टी होणार नाहीत आणि माझ्या नात्याबद्दल आणखी अफवा पसरवल्या जाणार नाहीत. माझ्या पोस्टमुळे बरेच लोक दुखावले गेले आहेत, मी लवकरच ते हटवेन.”
इतकेच नाही, तर अभिनेता किमव्यतिरिक्त त्याची एजन्सी साल्ट एन्टरटेन्मेंटनेही माफीनामा जारी केला आहे. एजन्सीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “अभिनेता किम सिओन होच्या वैयक्तिक बाबीच्या संदर्भात आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्याच वेळी, आम्ही त्या लोकांचीही माफी मागतो ज्यांना यामुळे त्रास सहन करावा लागला.”
यापूर्वी किमने माफी मागत लिहिले होते की, “मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत चांगला वेळ घालवला, पण मी तिच्या भावनांचा आदर केला नाही आणि तिला दुखावले.” त्याचवेळी त्याने असेही म्हटले होते की, “मला माझ्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायचे आहे आणि तिची माफी मागायची आहे, पण यावेळी मी माफी मागण्याचे धैर्य जमवू शकत नाही, यासाठी मी योग्य वेळेची वाट पाहत आहे.”
किमने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दात माफी मागितली होती. त्याने लिहिले होते की, “ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला, त्या सर्वांची मी माफी मागतो.”
Statement of kim seon-ho published in Koreaboo…minutes ago???????? pic.twitter.com/RKjqYnnFCk
— Imz (@imzccordon) October 20, 2021
त्याचबरोबर किमने ज्यांनी त्याला कठीण काळात साथ दिली, त्यांचे आभारही मानले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘माझा या गोष्टींवर विश्वास नाही’, म्हणत रिया कपूरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-‘बॅकलेस की टॉपलेस?’ नव्या आऊटफिटसह अवतरली उर्फी, तर ड्रेस पाहून चाहते पडले गोंधळात