Thursday, March 28, 2024

‘आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी डाळ मखनी आणि जिरा राईस…’, अभिनेत्री क्रांती रेडकरची ट्विटर पोस्ट चर्चेत

मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर खूप चर्चेत आली आहे. मराठी मनोरंजनविश्वातील उत्तम अभिनेत्री आणि डान्सर असलेली क्रांती नेहमीच तिच्या कामामुळे, सोशल मीडिया पोस्टमुळे सतत प्रकाशझोतात असते. क्रांतीने लग्नानंतर काम करणे कमी केले आणि मुली झाल्यानंतर ती सिनेमांमध्ये दिसलीच नाही. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात राहिली. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये क्रांती देखील आघाडीवर आहे. क्रांती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची मतं मांडताना दिसते.

मात्र, मागच्या काही दिवसांपासून क्रांती एका वेगळ्याच कारणामुळे लाईमलाईटमधे आली आहे. आर्यन खानला अं’मली पदार्थ प्रकरणामध्ये एनसीबीकडून अटक झाल्यानंतर क्रांतीच्या परिवारावर आणि खासकरून तिच्या पतीवर खूप आरोप करण्यात आले. एनसीबीचे मुख्य अधिकारी असणारे समीर वानखेडे क्रांतीचे पती असल्याने त्यांच्यावर करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपाला क्रांती मीडियासमोर येऊन सडेतोड उत्तरं देत आहे. त्यामुळे क्रांती मीडियामध्ये खूपच गाजत आहे. आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणावर बोलण्याऐवजी समीर वानखेडेंवर होणारे विविध आरोप आणि त्यांना उत्तरं देण्यासाठी समोर आलेला वानखेडेंचा परिवार तर सर्वांना माहित आहे. मीडियाकडून त्यांच्यावर होणारी प्रश्नांची सरबत्ती पाहून, क्रांती वैतागली आहे. या सर्व गोष्टींवर नुकतीच तिने एक उपहासात्मक पोस्ट तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.

क्रांतीने तिच्या या ट्विटमध्ये जिरा राईस आणि डाळ मखनीचा फोटो शेअर केला असून सोबत लिहिले की, “आमच्याकडे दुपारच्या जेवणासाठी डाळ मखनी आणि जिरा राईस होता. जीरा राईस आम्ही घरीच बनवला होता. मात्र, डाळ मखनी बाहेरून मागवली होती. डाळ मखनीची किंमत १९० रुपये इतकी होती. मला पुराव्यांसह ही माहिती मीडियाला देणे आवश्यक वाटले, जर उद्या सकाळी आम्ही सरकारी अधिकार्‍याचे जेवण खाल्ले असा आरोप कोणी केला तर?” क्रांतीचे हे ट्वीट तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या ट्विटला पाठिंबा देखील दिला आहे. काहींनी नवाब मालिकांना असे स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याचे देखील सांगितले आहे.

क्रांतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘जत्रा’, ‘गंगाजल’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘मर्डर मिस्त्री’, ‘फक्त लढ म्हणा’ अशा अनेक चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. यासोबतच तिने ‘काकण’ सिनेमातून एक दिग्दर्शिका म्हणून देखील पदार्पण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

असे काय झाले की, आपल्याच पोटच्या मुलाला विसरली जिनिलिया देशमुख? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास

‘रमाची खूप आठवण येतीये,’ म्हणत जितेंद्र जोशीने सांगितल्या त्याच्या आजीसोबतच्या गोड आठवणी

हे देखील वाचा