प्रदर्शित झाला कृती सेननचा ‘मिमी’ सिनेमा; ऑनलाइन लीक झाल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय


सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त कृती सेनन आणि तिच्या ‘मिमी’ या सिनेमाचीच चर्चा आहे. पंकज त्रिपाठी, कृती सेनन यांचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असलेल्या ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासून या सिनेमाबद्दल असलेली प्रेक्षकांची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. सरोगेट आईवर आधारित असणारा हा सिनेमा कॉमेडीसोबतच एक भावनिक चित्रपट आहे. हा सिनेमा ३० जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. मात्र प्रेक्षकांसाठी ‘मिमी’च्या टीमने एक खास घोषणा केली आहे.

‘मिमी’ हा सिनेमा चार दिवस आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे. अचानक झालेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनामुळे सर्वाना आधी वाटले की, हा सिनेमा लीक झाला आहे. मात्र चित्रपट समीक्षक असणाऱ्या तरण आदर्श यांनी ट्वीट करत चित्रपट प्रदर्शनाबद्दल सांगितले आहे. या ट्वीटमध्ये या सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या पंकज त्रिपाठी यांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला आहे. पंकज त्रिपाठी यांनी हा सिनेमा आज प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. (Kriti Sanon mimi movie released 4 days before)

पंकज या व्हिडिओमध्ये सांगतात, “‘मिमी’ हा सिनेमा सर्वांसाठी खूपच खास आहे. आमच्या सिनेमाच्या संपूर्ण टीमने आणि आम्ही मिळून ठरवले की, आज हा सिनेमा सहकुटुंब, सहपरिवार पाहायचा. मग विचार आला की, तुम्ही सर्व सुद्धा आमचे कुटुंबच आहेत ना, तुमच्याशिवाय हा चित्रपट खास कसा ठरणार.”

पुढे इंग्लिशमध्ये बोलताना पंकज म्हणतात, “‘मिमी’ इज डिलीवरिंग अर्ली, ते असे काही मुलं असतात ना जे वेळेच्या चार दिवस आधीच या जगात येतात. तीच आमची मिमी आहे. तर तुम्ही देखील सहकुटुंब बघा, आम्हीसुद्धा आता बघणार आहोत. आमच्या टीममधील दोन लोकांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे आमचे डबल सेलिब्रेशन होणार आहे. एक आमचे निर्माते दिनेश विजन आणि आणि दुसरी आमची ‘मिमी’ कृती सेनन. धन्यवाद.”

काही दिवसांपूर्वी ‘मिमी’ लीक झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. ‘मिमी’वर पायरसीची तलवार देखील लटकत होती. या सिनेमाचे HD व्हर्जन देखील ऑनलाइन उपलब्ध झाले होते. त्यामुळेच या सिनेमाच्या टीमने ‘शेरास सव्वाशेर’ अशी खेळी केली. या सिनेमात पंकज त्रिपाठी, कृती सेनन, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरणाबाबत राखी सावंत झाली व्यक्त; म्हणाली, ‘त्यांनी मला…’

राहुल- दिशाला आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले त्यांच्या घरी; नवदाम्पत्यासह डान्स करून केली ‘ईतकी’ मोठी मागणी

-शोएब इब्राहिमचे वडील ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात दाखल; दीपिका कक्करने केली सासऱ्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना


Leave A Reply

Your email address will not be published.