Monday, June 24, 2024

धक्कादायक! अभिनेत्री कृती सेननला देखील करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. बॉडी शेमिंग म्हणजे कलाकरांना त्यांच्या बॉडीवरून ट्रोल करणे किंवा त्यांच्या बॉडीवर चुकीच्या कमेंट्स करणे. याचा सामना आजपर्यंत अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी देखील केले आहे. सोशल मीडियावर कलाकारांना अनेकदा अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. बॉडी शेमिंगचा प्रत्यय अभिनेत्री कृती सेननला सुद्धा आला आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिंमतीवर येत मेहनतीने आणि संघर्षाने तिने तिचे स्थान येथे निर्माण केले आहे.

कृतीसाठी हे २०२२ चे नवीन वर्ष खूपच व्यस्त ठरणारे आहे. कारण यावर्षी कृतीचे तब्बल ५ सिनेमे प्रदर्शित होणार आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या सिनेमासाठी कृतीचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूपच कौतुक केले. नुकतेच कृतीने एका मुलाखतीदरम्यान तिला मिळणाऱ्या नकारात्मक कमेंट्सबद्दल भाष्य केले आहे. यात तिने लोकं कसे तिच्या बॉडीवर चुकीच्या आणि नकारात्मक कमेंट्स करत तिला शेम करतात हे देखील सांगितले.

कृतीने या मुलाखतीमध्ये सांगितले की, लोकं तिच्या हसण्यावर, एक्सप्रेशनवर आणि नाकावर चुकीच्या कमेंट्स करत असल्याचे सांगितले. यावेळी तिने एक घटना देखील सांगितली. ती म्हणाली की, तिला तिची कंबर अजून थोडी कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. ती पुढे म्हणाली की, तिला आधी अनेक वेळा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. मात्र कृतीने लोकांच्या या कमेंट्स कधीही मनावर घेतल्या नाही आणि तिने त्यांच्या सांगण्यावरून स्वतःमध्ये बदल केला नाही. तिला असा बदल करची कधी गरजच नाही वाटली. ती स्वतःला प्लस्टिकची बाहुली नाही समजत.

कृती मुलाखतीमध्ये म्हणाली, “मी या सर्व गोष्टींमधून गेली आहे. अनेक गोष्टी ऐकल्या. विनाकारण लोकं माझ्या बॉडीवर कमेंट्स करताना देखील मी ऐकले आणि पाहिले. मात्र मी स्वतःशी ठरवले होते की, मला यासर्व कमेंट्स मनावर न घेता त्या सोडून देणे योग्य वाटले. मी ज्या खास गोष्टी घेऊन जन्माला आली आहे त्यासाठी माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी ज्या लोकं सरळ समोर बोलत नाही त्या सर्व गोष्टी प्रत्येक जणं ऐकतो. कोणती तरी मला सांगितले की, आता असा कोणताच दबाब नसतो, मात्र इंस्टाग्रामवरील फिल्टरमुळे असा दबाव वाढत आहे. प्रत्येकाला परफेक्ट राहायचे आहे.”

यासोबतच तिने हे देखील सांगितले की, तिला अनेक चित्रपटांमध्ये रिप्लेस देखील करण्यात आले. तिने अनेक चित्रपटांसाठी फ्रेश फेस म्हणून ऑडिशन दिले आणि तेव्हा तिच्या जागी कोणत्या स्टारकीडला घेण्यात आले.

कृतीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’ आणि वरुण धवनसोबत ‘भेडिया’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती प्रभास आणि सैफ अली खान यांच्यासोबत ‘आदिपुरुष’मध्ये, अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ तर कार्तिक आर्यनसोबत ‘शहजादा’मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा