Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बॉलिवूडमध्ये फक्त तूच खरा मर्द, जो कोणालाही….’, म्हणत केआरकेने केले अर्जुन कपूरचे कौतुक

कमाल राशिद खान म्हणजेच केआरके सध्या वादाच्या भोवऱ्यात असून चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत पंगा घेतल्यानंतर त्याला गायक मिका सिंगने सोशल मीडियावर चांगलाच बोल लावले. यानंतर त्याने गोविंदाचे नाव घेत ट्वीट केले. तसेच त्यानंतर त्याने स्पष्टीकरणही दिले. मात्र, आता या प्रकरणात त्याने बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरलाही ओढले आहे. यासोबतच त्याने अर्जुनला आपला मित्र असल्याचे सांगत त्याला खरा मर्द म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याने त्याचे ट्विटर अकाऊंट अनलॉक केल्याने त्याचे हे ट्वीटही आता व्हायरल होत आहे.

सलमान खानपासून सुरू झालेला हा वाद आता वाढताना दिसत आहे. गोविंदाचे नाव घेतल्यानंतर त्याने अर्जुन कपूरचे कौतुक करणारे एक ट्वीट केले आहे.

केआरकेने अर्जुन कपूरला टॅग करत ट्वीट केले की, “धन्यवाद अर्जुन भाई, तू मला फोन केला आणि माझ्याशी चर्चा केली. आता मला समजले आहे की, बॉलिवूडमध्ये फक्त तूच माझा चांगला मित्र आहे. तसेच बॉलिवूडमध्ये फक्त तूच खरा मर्द आहे, जो कोणालाही भीत नाही. आता मी कधीच तुझ्या चित्रपटांचा निगेटिव्ह रिव्ह्यू करणार नाही.”

सलमान- केआरके वाद
केआरकेचा सध्या सलमान खान आणि त्याच्या समर्थकांसोबत वाद आहे. त्याने म्हटले होते की, त्याने सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाबद्दल रिव्ह्यू शेअर केला. त्यानंतर सलमानच्या वकिलांनी त्याच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.

यावर सलमान खानच्या अधिकृत टीमने स्पष्टीकरण देत म्हटले होते की, “हा गुन्हा यासाठी दाखल केला आहे, कारण त्याने सलमान खानला बदनाम करण्यासाठी त्याला भ्रष्ट असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त त्याच्या बिइंग ह्युमनवर फसवणूक आणि पैशांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.”

केआरके कायद्याच्या सापडला आहे. अशामध्ये अर्जुन कपूरने त्याला धीर दिला आहे. तसेच केआरकेनेही त्याच्याविरुद्ध टीका करणार नसल्याचे वचन आपल्या ट्वीटमधून दिले आहे.

खरं तर यापूर्वी केआरकेने गोविंदाचे नाव घेतले होते. यावर स्पष्टीकरण देत त्याने ट्वीट केले होते की, ज्या गोविंदाबद्दल तो बोलत होता, तो बॉलिवूड अभिनेता गोविंदा नाही, तर त्याचा मित्र आहे. त्याचेही नाव गोविंदा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा