Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्रीच्या घरी लक्ष्मीचे आगमन, गेल्या महिन्यातच घेतला होता शोचा निरोप

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये अभी आणि प्रज्ञा यांच्या मुलींची कथा दाखवली जात आहे. ‘कसौटी जिंदगी की २’ आणि ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिने नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. पूजाने मुंबईतील रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकताच तिचे चाहते खुश झाले आहेत. गेल्या महिन्यातच अभिनेत्रीने ‘कुमकुम भाग्य’ या शोला अलविदा केला. तिने तिच्या संपूर्ण गरोदरपणात शोमध्ये काम केले.

पूजा बॅनर्जीचा (Pooja Banerjee) भाऊ नील याने सांगितले की, मुलीच्या जन्मापासून संपूर्ण कुटुंब आनंदी आहे आणि आम्ही सर्व नागपुरात आहोत. पूजासोबत तिचा पती संदीप सेजवाल आणि मुलीची आजी हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याचीही लवकरच भेट घेणार आहोत. नीलने सांगितले की, “गेल्या महिन्यातच आम्ही पूजासोबत एकत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मुलीच्या जन्मानंतर आता पूजा दिल्लीला येणार असून संपूर्ण कुटुंब हा आनंद साजरा करणार आहे.

पूजा बॅनर्जीने २०११ मध्ये एमटीव्ही ‘रोडीज सीझन ८’ मधून तिचा टेलिव्हिजन प्रवास सुरू केला, ज्यामध्ये ती फायनलही होती. यानंतर तिने २०१२ मध्ये स्टार प्लस शो ‘एक दूस से करते हैं प्यार हम’ केला. तेव्हापासून ती ‘कसौटी जिंदगी की २’, ‘दिल ही तो है’, ‘कहने को हमसफर हैं’, ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा’ इत्यादींसह अनेक शोमध्ये दिसली आहे.

पूजाने तिच्या गरोदरपणात पूर्णवेळ शोमध्ये काम केले होते. ती सतत शोसाठी शूटिंग करत होती. तिने गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात पाऊल ठेवताच गेल्या महिन्यात या शोचा निरोप घेतला होता. त्यावेळी पूजा असे म्हटली की, “मला माहित आहे की, दिवस जवळ येत आहे, परंतु मी शो सोडण्यास तयार नाही. सेटवर सर्वांकडून मिळणारे प्रेम पाहून खूप आनंद झाला. सेटवर सगळ्यांनी माझी काळजी घेतली.”

सेटवर शोच्या टीमने पूजासाठी सरप्राईज फेअरवेल पार्टीची योजना आखली होती. ज्याचे फोटो पुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले होते. अभिनेत्रीने तिच्या ‘कुमकुम भाग्य’ टीमचे आभार मानणाऱ्या भावनिक नोटसह सरप्राईज फेअरवेल पार्टीचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने तिच्या गरोदरपणात मिळालेल्या विशेष प्रेमाबद्दल संपूर्ण टीमचे आभार मानले होते.

‘या’ अभिनेत्रीने पूजापूर्वी सोडला होता
पुजा बॅनर्जीपूर्वी एका अभिनेत्रीने प्रेग्नेंसीमुळे ‘कुमकुम भाग्य’ शो सोडला होता. अभिनेत्री शिखा सिंगने प्रेग्नेंसीमुळे शोला अलविदा केला होता आणि आजपर्यंत ती शोमध्ये परतली नाही. ‘कुमकुम भाग्य’मध्ये पूजाने रिया मेहराची भूमिका साकारली होती. या शोमध्ये तिने तीन वर्षे काम केले. तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाi चांगलीच आवडली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा