टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल


‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) आणि ‘कसौटी जिंदगी के’ (Kasautii Zindagii Kay) मालिकांमध्ये लोकप्रिय भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी लवकरच आई होणार आहे. हे तर तिने स्वतःच काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर जाहीर केले होते. नुकतेच पूजाचे डोहाळे जेवण करण्यात आले. २५ डिसेंबर नाताळच्या दिवशी पूजाचे डोहाळे जेवण संपन्न झाले. या डोहाळे जेवणाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः पूजाने देखील तिच्या या कार्यक्रमाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

या डोहाळे जेवणासाठी पूजाने गुलाबी रंगाच्या गाऊनची निवड केली होती. या कार्यक्रमाला पूजा तिच्या नवऱ्यासोबत संदीप सेजवालसोबत दिसली. पूजाच्या या फोटोंवर नेटकरी भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे. पूजाने तिच्या गाऊनसोबत गळ्यात नाजूक आणि आकर्षक असा डायमंड नेकलेस आणि कानात मॅचिंग इयररिंग्स घातलेल्या दिसल्या. तिच्या या लूकवर तिने केसांचा बन केला होता. पूजाचा हा लूक अतिशय साधा मात्र लक्षवेधी ठरत होता. पूजाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्या मेहेंदीच्या फोटोनी सर्वांचे खास लक्ष वेधून घेतले आहे. पूजाच्या एका हातावर मेहेंदीने तिला आणि तिच्या नवऱ्याला रेखाटले आहे, तर दुसऱ्या हातावर एक छोटे बाळ दिसत आहे.

तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत बसली असून, त्यांच्यासमोर एक केक ठेवला आहे. सोबतच एक गुलाबी आणि एक निळ्या रंगाची बाहुली देखील दिसत आहे. तर मागे फुग्यांचे डेकोरेशन करण्यात आले आहे. यावेळी तिच्या इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती.

पूजा सहा महिन्यांची प्रेग्नेंट असून, ती मार्च २०२२ मध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. प्रेग्नेंट असूनही पूजा तिचे काम करत आहे. प्रेग्नन्सीमुळे तिच्या शरीरात, स्वभावात होणारे सर्व बदल ती एन्जॉय करत असून, ती तिच्या बाळासाठी खूपच उत्सुक आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!