Wednesday, July 3, 2024

टेलिव्हिजनवरील संस्कारी सून घरी नवऱ्यासोबत वागते असे, पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

‘कुंडली भाग्य’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच श्रद्धा आर्या. मालिकेतील तिचे प्रीता हे पात्र अनेकांना आवडत आहे. ती सध्या तिचा पती राहुल नागिलसोबत वेळ घालवताना दिसत आहे. हनिमून असो किंवा होळी साजरी असो, श्रध्दा आणि राहुल अनेकदा परफेक्ट कपल गोल सेट करताना दिसले आहेत. अलीकडेच श्रद्धाने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा पती राहुल नागल देखील दिसत आहे. श्रद्धाचा हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या पतीच्या लांबीचा फायदा घेताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला श्रद्धाने लिहिलं आहे की, “माझा नवरा घरी असतो तेव्हा मी असं वागते.”

व्हिडिओमध्ये श्रद्धा आर्या पती राहुलला किचनच्या वरच्या बाजूला ठेवलेला बॉक्स काढायला सांगते. त्याचवेळी श्रद्धाचा नवरा घरी नसताना ती शेल्फवर उभी राहते आणि स्वयंपाकघरातील डबा काढून घेते. व्हिडिओ शेअर करताना, श्रद्धाने एक मजेदार कॅप्शन देखील लिहिले – “हेहे, मी अशी का आहे.”

नुकताच श्रद्धा आर्याने तिच्या पतीचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले.

फोटोंमध्ये पती-पत्नी दोघेही आनंदात दिसत होते. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला श्रद्धा आर्यने राहुल नागलसोबत लग्न केले आहे. या अभिनेत्रीने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. श्रद्धाने लग्नाआधी राहुलला डेट केले होते, मात्र तिने याबाबत कोणालाच कळू दिले नाही. श्रद्धाचा नवरा नेव्ही ऑफिसर आहे, ज्याचा अभिनेत्रीला खूप अभिमान आहे. तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यावर सगळ्यांना तिच्या पतीबाबत माहिती मिळाली. त्याआधी त्याच्याबद्दल कोणालाही काहीच माहित नव्हते. त्यांचं लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा