Monday, April 21, 2025
Home मराठी कुशल बद्रिके हिंदी सिनेसृष्टी गाजवण्यास सज्ज; झळकणार रिअॅलिटी शोमध्ये

कुशल बद्रिके हिंदी सिनेसृष्टी गाजवण्यास सज्ज; झळकणार रिअॅलिटी शोमध्ये

अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अनेत चित्रपटात त्याने दमदार कामगिरी केलीय पण त्याला वेगळी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी रिअॅलिटी शोने दिली आहे. आता त्याने आणखी एक यशाची पायरी चढली असं म्हणायला हरकत नाही. कुशल बद्रिके हिंदी सिनेसृष्टी गाजवण्यास आता सज्ज झाला आहे. एका लोकप्रिय हिंदी चॅनेलवरील विनोदीा शोमध्ये दिसणार असून त्याचा प्रोमो रीलिज झाला आहे.

सोनी टीव्हीवरील “मॅडनस मचाऐंगे” या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कुशलदेखील पाहायसा मिळत आहे. मात्र, ‘मॅडनेस मचायेंगे’ कधीपासून प्रसारित होईल, याची तारीख अद्याप जाहिर झालेली नाही. कुशल सोबतत या टी व्ही शोमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीदेखील असल्याचं या प्रोमोमध्ये दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वी, व्हॅलेंटाईन डे दिवशी कुशल आपल्या पत्नीसाठी खास ‘व्हॅलेंटाईन’ स्पेशल पोस्ट शेअर केली होती. ‘तुमच्या सोबत झालंय का कधी असं? की एखादं माणूस आपल्या समोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ स्लो मोशनमध्ये धावायला लागतं. न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण तरंगूच लागतो एकदम.

जत्रेतल्या चष्मेवाल्याकडचा “गुलाबी गॉगल” चढवल्या सारखं फक्त आपलंच जग “गुलाबी” होऊन जातं आणि “जत्रेतला पाळणा” अजूनही स्लो मोशनमध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो, बास बास तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला, राजाहो तुम्ही प्रेमात आहात, आता स्लो मोशनमधलं “जत्रेतलं घड्याळ” आणि तुमच्या “मनगटावरचा पाळणा” नॉर्मलला आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे. देव तुमचं भलं करो.’ अशी भली मोठी कॅप्शन देत कुशलने बायकोवरील प्रेम व्यक्त केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘सत्यप्रेम की कथा’ च्या मराठमोळ्या दिग्दर्शकाने गुपचुप उरकला साखरपुडा; फोटो व्हायरल
हत्तींची हत्या अन्…’पोचर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ट्रेलर पाहून अंगावर काटा येईल

हे देखील वाचा