बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट (Alia BHatt) लवकरच नव्या सीरिजद्वारे तुमच्या भेटीला येत आहे. नुकतचं आलिया भटचा आगामी प्रोजेक्ट ‘पोचर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर पाहून चाहत्यांच्या अंगावर काटा आला आहे. पोचर ही सीरिज क्राइम ड्रामा सिरीज आहे. त्यामुळे या सिरीजबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे.
ही सीरिज सत्य घटनेवर आधारीत आहे. पोचर वेबसीरिजची कथा भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या हस्तिदंत शिकार टोळीवर आधारित आहे. ‘पोचार’च्या पहिल्या झलकमध्ये, आलिया भट जंगलात उभं राहून सांगताना दिसते की ‘मर्डर इज मर्डर’. आलिया भट कार्यकारी निर्माती म्हणून या मालिकेशी जोडली गेली आहे. आता या सीरिजचा ट्रेलर रीलिज झाला आहे.
ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, ९० च्या दशकात सुरुवातीला केरळमध्ये हत्तींची निर्दयी आणि सतत हत्येची घटना घडताना दिसते.
त्यानंतर वनविभागाच्या मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यास सांगितले. तपास सुरू केल्यानंतर अवैध हस्तिदंत शिकार करणाऱ्या टोळीचे हे काम असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलीस या टोळीला पकडण्यास सुरुवात करतात.आता या टोळीतील आरोपींना पोलीस कसे अटक करतात हे सीरिज पाहिल्यानंतरच समजेल.
अन्वेषणात्मक क्राईम ड्रामा सीरिज पोचर २३ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. तसेच, ही सीरिज हिंदी, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये रीलिज होणार आहे. या सीरिजमध्ये रोशन मॅथ्यू, निमिषा सजयन आणि दिव्येंदू भट्टाचार्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
‘पोचर’ या सीरिजची ही कथा भारतीय वन सेवेतील अधिकारी, एनजीओ कर्मचारी, पोलीस हवालदार आणि तपासादरम्यान न्याय मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींच्या भोवती फिरते. सुटेबल पिक्चर्स, पुअर मॅन्स प्रॉडक्शन्स आणि क्यूसी एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने आलिया तिच्या इटरनल सनशाइन प्रॉडक्शनद्वारे या सीरिजसाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
महाभारताचे कृष्ण नितीश भारद्वाज यांची IAS पत्नीविरुद्ध पोलिसात धाव; नेमकं काय घडलं?
नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर, पोस्टर झाला रिलीझ










