आपल्या विनोदी अभिनयाने आज घराघरातील लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. त्याच्या दिलखुलासा अभिनयाने आणि विनोदाने आज कितीतरी लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी झाले आहे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम तर सर्वानाच माहीत आहे. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यातील कलाकार.
प्रत्येकामध्ये एक वेगळेच टॅलेंट दडलेले आहे. अनेकवेळा फारुळे बाई, पत्रकार, पोलीस यासारख्या अनेक भूमिकेतून प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात सोडून देणारा विनोदी कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा सोशल मीडियाचा देखील पुरेपूर वापर करत असतो. अशातच त्याने भाऊ कदमसोबत एक फोटो शेअर केला आहे. (Kushal badrike share a photo with bhau kadam on social media)
कुशलने अधिकृत फेसबुक पेजवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, भाऊ कदम कुशल बद्रिकेचे केस कापत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “गेली अनेक वर्ष मी आणि भाऊ एकत्र प्रवास करतो, पांडूच्या निमित्ताने आम्ही केसही कापायला सोबत जाऊ लागलो, एकदा भाऊचं लवकर आटपलं, तर पठ्ठ्याने चक्क माझे केस कापायला घेतले, नशीब !! प्रकरण फक्त फोटोवर निभावलं नाहीतर सिनेमात मी फार भयंकर दिसलो असतो आणि असा भाऊने माझा केसाने गळा कापला असता.”
https://www.facebook.com/250377495814967/posts/1075886599930715/
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या जोडीने ‘पांडू’ चित्रपटातून आख्ख्या महाराष्ट्राला हसवले आहे. त्यांचा हा चित्रपट चांगलाच गाजला आहे. चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्राजक्ता माळी होत्या. त्यांच्या या चित्रपटात त्यांनी त्यांच्या निखळ विनोदाने सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. अशातच कुशलने केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही एक लोकप्रिय जोडी आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये त्यांच्या अभिनयाने सगळेच खळखळून हसतात. अशातच त्यांचा हा फोटो समोर आल्याने त्यांच्यातील ऑफस्क्रीन प्रेम देखील सगळ्यांना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
‘अंगात आलया’ गाण्यावर जॉनी लिव्हरने धरला मुलांसोबत ठेका, पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है
मुलीच्या चेहऱ्यावर आहेत पुरुषांपेक्षा जास्त केस; पण लाज घेऊन जगण्यापेक्षा, ती जगासमोर बनलीय उदाहरण