Monday, June 24, 2024

कुशल बद्रिके लवकरच दिसणार नविन भुमिकेत; व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातुन प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कलाकार आता घराघरात पोहोचले आहे. या कलाकारांनी त्यांच्या विनोदशैलीने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांपैकीच एक नाव म्हणजे ‘कुशल बद्रिके’. कुशल हा जेवढा विनोद करण्यात अग्रेसर आहे तेवढाच तो सोशल मीडियावरहि सक्रिय आहे. तो नेहमी त्याचे व त्याच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तर चला बघूया नेमके कुशलने या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिले आहे?

कलाकार नेहमी त्यांच्या सोशल मीडियाचा वापर खूप जाणीवपूर्वक करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार त्यांच्या आगामी प्रोजेक्ट आणि चित्रपटाविषयी सांगत असतात. चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रके (Kushal badrike) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम (instagram) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. चाहते देखील त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

कुशलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या आगामी सिनेमाचा आहे. या सिनेमात तो नवीन भूमिकेत दिसणार आहे. या पोस्ट मध्ये त्याने असे लिहिले आहे की, ‘कमिंग विथ द न्यू फिल्म “बाप माणूस”…..लेकीसाठी तिचा बाबा हा कायमच ‘बापमाणूस’असतो…गोष्ट वडील मुलीच्या अतूट नात्याची , फादर्स डे ला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात… या सिनेमात पुष्कर जोग (pushakar jog), अनुषा दांडेकर (anusha dandekar), शुभांगी गोखले (shubhangi gokhale), कुशल बद्रिके (Kushal badrike) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमात तगडी स्टारकास्ट असल्यामुळे चाहत्यांना देखील सिनेमाची उत्सुता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

 

त्याने पांडू सिनेमाच्या सेटवरचा व्हिडिओ देखील त्याने काही शेअर केले होते. तसेच तो चला हवा द्या या कार्यक्रमाच्या सेट वरून सहकलाकारांची फिरकी घेत असतानाचा व्हिडीओ शेअर करत असतो. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता असते कि कुशल कोणता विनोदी व्हिडिओ शेअर करेल? त्याने पांडू, जत्रा, स्लॅमबूक, डावपेच, बकुळा, नामदेव घोटाळे अशा अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारली आहे. (kushal-badrike-share-instagram-post-about-upcoming-film-baap-manus-viral-video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमानने घातलेल्या घड्याळाने वेधले सर्वांचे लक्ष…नेमकं काय खास आहे या घड्याळात?
मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा

हे देखील वाचा